सोनाली म्हटले की डोळ्यासमोर येते नितळ सौंदर्य आणि बहारदार नृत्य. ‘अप्सरा आली म्हणत’ सोनाली कुलकर्णीने सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेतला. आपल्या अदांनी, नृत्याने, सौंदर्याने सर्वाना घायाळ करणारी सोनाली सध्या खूप चर्चेत आहे. सोनालीने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ती मराठी लोकांच्या नजरेत अधिक मोठी झाली. सोनालीने अभिनेत्री आधी एक उत्तम डान्सर अशी ओळख बनवली होती. डान्स तिचा श्वास आहे. अशाच या डान्स संबंधी सोनालीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सोनालीने नुकतेच झी मराठीवरील ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज’च्या ग्रँड फिनालेच्या निमित्ताने एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली. सोनालीने इथून पुढे मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये कधीही हिंदी गाण्यांवर डान्स करणार नसल्याचे सांगितले आहे. आपली मातृभाषा जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. प्रत्येकाने आपली मातृभाषा जपण्यासाठी थोडा प्रयत्न करायलाच हवा असंही ती यावेळी म्हणाली.
मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये नेहमीच मराठीपेक्षा जास्त हिंदी गाण्यांवरच डान्सचे सादरीकरण केले जाते. अशा सादरीकरणांवर अनेक वेळा विविध स्तरातून टीका देखील झाली आहे, पुरस्कार सोहळा मराठी आणि त्यात जास्तकरून हिंदी गाण्यांचा वापर होतो. हेच कुठेतरी थांबण्यासाठी कमी होण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. सोनालीने हा निर्णय घेत कुठेतरी बदलला सुरुवात केली आहे.
सोनालीसाठी नृत्य खूप महत्वाचा आणि जवळचा विषय आहे. त्याबाबतचा तिने एवढा मोठा निर्णय घ्यावा खरंच खूप स्तुत्य कल्पना आहे. सोनाली झी मराठीच्या ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज’ या रियालिटी शो मध्ये परीक्षकांची भूमिका निभावत आहे.
सोनाली तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली होती. नुकतीच ती लंडनहून परतली आहे. या सिनेमात सोनालीसोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहे. दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
पाठीमागे सोनालीने दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा केला आहे. २ फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीने आपल्या वाढदिवशी केली. १८ मे रोजी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.










