Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर ‘ती घटना इतकी अपमानजनक होती की मी थेट साधू व्हायचे ठरवले होते’ अनुपम खेर यांच्या पहिल्या डेटची आठवण

‘ती घटना इतकी अपमानजनक होती की मी थेट साधू व्हायचे ठरवले होते’ अनुपम खेर यांच्या पहिल्या डेटची आठवण

आपल्या कुशल अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे अनुपम खेर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेले आणि जेष्ठ कलाकार आहेत. सध्या अनुपम खेर खूपच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी नुकताच त्यांच्या पॉडकास्ट ‘अनुपम केयर्स’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेयर केला आहे.

या ट्रेलरची सर्वात खास गोष्ट म्हणजे या ट्रेलरमध्ये अनुपम खेर यांनी त्यांच्या पहिल्या डेटबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यात त्यांनी सांगितले की, एकदा तर मी साधू होण्याचे ठरवून टाकले होते. हा ट्रेलर शेयर करताना त्यांनी लिहले की, “माझ्या पॉडकास्टचा ट्रेलर, ही माझ्या सर्वात वाईट डेटची गोष्ट आहे. ज्यातून बाहेर येण्यासाठी मला आश्रमात जावे लागले होते.”

अनुपम यांनी त्यांच्या पहिल्या डेटबद्दल सांगितले की, “ते त्यांच्या पहिल्या डेटला एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे असे काही घडले की,  ऑर्डर केलेले स्वीट कॉर्न, चिकन सूप माझ्या मांडीवर होते आणि माझ्या शर्टवरून ग्रेव्ही टपकत होती. तर नूडल्स माझ्या डोक्यावर लटकलेल्या होत्या. जणू काही मी नवरदेव असून त्या नूडल्स माझा सेहरा आहेत. ही घटना घडल्यानानंतर मला खूप अपमानजनक वाटत होते.’

‘मी इतका हादरलो होतो की, रेस्टोरंटमधून बिल न देताच बाहेर निघालो. घराकडे चालत असतांना मी माझ्या कानात अडकलेले सूप काढत होतो, तेव्हा विचार आला की खरंच पहिल्या प्रेमाची भावना अशी असते का? त्यानंतर मी प्रेम वगैरे सर्व सोडून साधू होण्याचा देखील विचार केला होता.’

अनुपम खेर हे सध्या दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा काश्मीर पंडितांची हत्या आणि त्यांच्या काश्मीर सोडण्याच्या घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा याचवर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आणि आता ऑगस्ट २०२१ मध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

हे देखील वाचा