Tuesday, January 27, 2026
Home कॅलेंडर सरत्या वर्षाने जाताजाता ‘या’ अभिनेत्रीला दिला झटका, इमर्जन्सी करावी लागली सर्जरी

सरत्या वर्षाने जाताजाता ‘या’ अभिनेत्रीला दिला झटका, इमर्जन्सी करावी लागली सर्जरी

हे वर्ष खूप कमी लोकांसाठी चांगले ठरले असेल. नाहीतर यावर्षाने आयुष्यभर लक्षात राहतील अशा वाईट आठवणी दिल्या आहेत. यावर्षाने अनेक प्रकारे लोकांना फक्त आणि फक्त मनस्ताप दिला आहे. २०२० संपत असतांना देखील वाईट बातम्यांचा ओघ सुरूच आहे. मनोरंजन विश्वासाठी तर हे वर्ष काळं ठरलं आहे. कारण अनेक मोठ्या आणि चांगल्या कलाकारांना आपण गमावले तर काहींना मोठ्या आजारांना तोंड दयावे लागले. अशातच टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री श्रुती सेठ हिने देखील तिची एक सर्जरी झाल्याचे सांगितले आहे.

श्रुती सेठने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून तिचा एक फोटो शेयर करत तिची एक सर्जरी झाल्याचे सांगितले आहे. तिने तिचा एक हॉस्पिटलमधला एक फोटो शेयर करत चाहत्यांना काही सल्ले दिले आहेत. ‘‘मला अचानक डॉक्टरांनी इमर्जन्सी सर्जरी सांगितल्यामुळे २०२० ने जाताजाता मला आणि माझ्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का दिला आहे. मला या सर्जरीमुळे माझे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सर्व प्लॅन्स मला रद्द करावे लागले. यातून मला जो धडा घ्यायचा होता तो मी घेतला. मी माझी नीट काळजी घेतली नाही याची मला शिक्षा मिळतेय. तुम्ही तुमच्या आरोग्याला कधीच गृहीत धरू नका. रोज सकाळी तुम्हाला डोळे उघडून जग बघण्याची संधी मिळतेय आणि रोज रात्री तुम्ही शांत झोपू शकता यासाठी कृतज्ञ राहा” असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहले आहेत.

पुढे ती म्हणते, ” हॉस्पिटल आपल्याला जाणीव करून देतात की, अहंकार, पर्सनॅलिटी आणि आयुष्य यांच्यापुढे आपला जीव फक्त एक विज्ञान आहे. जेवण हे आपल्या मेंदूसाठी आवश्यक तर शरीर फक्त सलाइनवरही जिवंत राहू शकते. त्यामुळे सकाळी उठवण्यासाठी आणि रात्री झोपवण्यासाठी आभारी राहा. शरीराची योग्य काळजी घ्या जेणेकरून वेळेवर तेच शरीर आपल्याला साथ देईल. लोकांकडून चांगले आशीर्वाद घ्या, आणि जे लोकं तुमच्यावर प्रेम करतात, तुमची काळजी घेतात अशा लोकांना नेहमी जवळ ठेवा. मी तुम्हाला नवीन वर्षासाठी खूप शुभेच्छा आणि सकारात्मकता पाठवत आहे. तुमच्या प्रेम आणि काळजीसाठी आभारी आहे.”

श्रुतीने टीव्हीवर ‘शरारत’ मालिकेपासून अभिनयाला सुरुवात केली. तिने अनेक मालिका आणि ‘फना’, ‘राजनीति’, ‘ता रा रम पम’, ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘आगे से राइट’, ‘माय फ्रेंड पिंटो’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा