Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड ‘अश्रू आणि घाम दोन्हींमध्ये मीठ असतं, पण…’ अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

‘अश्रू आणि घाम दोन्हींमध्ये मीठ असतं, पण…’ अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट इंटरनेटवर व्हायरल

बॉलिवूडचे महानायक अशी ज्यांची ओळख आहे, ते म्हणजे अमिताभ बच्चन होय. जरी ते ८० च्या दशकातील असतील, तरीही आज ते इतर कलाकारांना टक्कर देतात. मग तो अभिनय असो, डान्स असो किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहणे असो. ते नेहमीच सगळ्यात पुढे असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा चांगला वावर असतो. व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांची माहिती ते सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना देत असतात. तसेच ते अनेक मुद्यांवर देखील त्यांचे मत मांडत असतात. अशातच त्यांची एक पोस्ट समोर आली आहे. ज्यावर त्यांचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “अश्रू आणि घाम या दोन्हींमध्ये मीठ असते, पण दोघांचे मीठ वेगळे असते.” त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांचे अनेक चाहते या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत ३ हजारपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (Amitabh Bachchan’s post viral on social media)

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील एक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘शोले’, ‘मर्द’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सुर्यवंशम’, ‘मोहब्बते’, ‘पा’, ‘डॉन’, ‘कूली’, ‘दिवार’, ‘चेहरे’, ‘पिंक’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. या दिवसात ते त्यांचा आगामी चित्रपट ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत नॅशनल क्रश रश्मीका मंदाना दिसणार आहे. तसेच त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो देखील होस्ट केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिटत जाती दूर रेषा, अंतराने आखल्या…’, स्पृहा जोशीने ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोसह सादर केली हृदयस्पर्शी कविता

-संजयच्या अफेयरमुळे चिंतित होते वडील सुनील दत्त; एकेकाळी त्यांचे देखील नाव जोडले गेले होते त्या अभिनेत्रीसोबत

-5जी प्रकरण: जुही चावलाने हायकोर्टातून मागे घेतली याचिका, कोर्टाने ठोठावला होता २० लाखांचा दंड

हे देखील वाचा