Thursday, April 25, 2024

संजयच्या अफेयरमुळे चिंतित होते वडील सुनील दत्त; एकेकाळी त्यांचे देखील नाव जोडले गेले होते त्या अभिनेत्रीसोबत

गुरूवारी संजय दत्तने त्याचा ६२ वा वाढदिवस साजरा केला आहे. संजयचे आयुष्य म्हणजे आता खुली किताब झाले आहे. त्याच्या आयुष्यातील लहानलहान गोष्ट देखील प्रेक्षकांना माहित झाली आहे. संजयचे जीवन हे त्याच्या चित्रपटांमुळे, वैयक्तिक जीवनामुळे आणि मुख्य म्हणजे त्याच्या अफेयर्समुळे तुफान गाजले. संजयने त्याच्या आयुष्यात अनेक संकटाना त्याने तोंड दिले. संजयच्या जीवनावर तयार झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाचा आधार घेऊन सांगायचे झाले, तर त्याचे ३०८ मुलींसोबत अफेयर होते. यामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश होता. अगदी माधुरी दीक्षितपासून ते सुश्मिता सेनपर्यंत अनेक अभिनेत्रींची नावे या यादीत आहेत. मात्र या यादीत एक असे नाव होते की, त्या अभिनेत्रींसोबत संजय दत्त आणि सुनील दत्त या दोघं बापलेकांचे नाव जोडले गेले. ती अभिनेत्री होती रेखा.

संजय आणि रेखाने १९५४ साली ‘जमीन आसमान’ हा सिनेमा केला. या सिनेमात संजयने रेखाच्या मुलाची भूमिका साकारली होती. लेखक यासीर उस्मान यांच्या ‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकानुसार, संजय रेखा यांच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटानंतर त्यांच्या भेटी जवळीकीमध्ये बदलल्या. सेटवर आणि बाहेरही ते दोघं अनेकदा सोबत दिसायला लागले. जेव्हा याबद्दल सुनील दत्त यांना समजले तेव्हा त्यांना खूप चिंता वाटू लागली. एका रिपोर्टनुसार, संजय आणि रेखाने गुपचूप लग्न देखील केले होते. (when sanjay dutt fall in love with rekha after his father)

सुनील दत्त यांना या अफेयरबद्दल समजले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी संजयला त्याच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. मात्र संजयने असे केले नाही. तेव्हा सुनील दत्त यांनी रेखा यांनाच त्याच्यापासून लांब राहायला सांगितले. यानंतर रेखा यांनी संजयपासून लांब राहायला सुरुवात केली. एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी सांगितले होते की, संजयसोबत अफेयर त्यांनी फक्त अमिताभ यांना जळवण्यासाठी केले होते. या प्रकरणावर पूर्णविराम लावण्यासाठी सुनील दत्त यांनी एक प्रेसनोट देखील काढली होती.

सुनील दत्त यांना रेखा आणि संजय यांच्या नात्यामुळे खूपच टेन्शन आले होते. कारण एका काळात सुनील दत्त यांचे देखील रेखासोबत नाव जोडले गेले होते. सुनील आणि रेखाने ‘नागिन’, ‘प्राण जाए पर वचन ना जाए’ अशा चित्रपटांमध्ये काम केले होते. यादरम्यानच या दोघांच्या अफेयरच्या बातम्या उडाल्या होत्या. नर्गिस यांना देखील याबद्दल माहित होते. नर्गिस यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “रेखा या पुरुषांना असे संकेत द्यायच्या, की त्या खूपच सहज उपलब्ध होतील. काही लोकांच्या नजरेत तर त्या एखाद्या चुडेल पेक्षा कमी नव्हत्या. काही लोकं मानसिक समस्यांमुळे खूप त्रासात असतात. त्या नेहमी कुठेतरी तंद्री लावून राहायच्या, त्यांना एका चांगल्या पुरुषाची गरज होती.” विशेष म्हणजे त्यावेळी हे प्रकरण खूपच चर्चेत आलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा