Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड मीरा राजपूतचा फोटो पाहून पती शाहिद कपूरने ‘या’ खास व्यक्तीसोबत केली तिची तुलना

मीरा राजपूतचा फोटो पाहून पती शाहिद कपूरने ‘या’ खास व्यक्तीसोबत केली तिची तुलना

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारे जोडपे म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. मीरा ही चित्रपटसृष्टीपासून जरी लांब असली, तरीही सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर असतो. त्यामुळे ती देखील प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. ते दोघेही नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच मीराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. पाहायला गेलं तर तिचा हा फोटो म्हणावा इतका काही खास नाहीये. पण तिच्या पतीने या फोटोवर कमेंट करून हा फोटो खास बनवला आहे. शाहिद कपूरने मीराच्या या फोटोची तुलना एका खास व्यक्तीसोबत केली आहे.

शनिवारी (३० जुलै) मीरा राजपूतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक सनकिस्ड सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मीरा सूर्याच्या प्रकाशात उभी राहून सेल्फी घेत आहे. या फोटोमध्ये तीने डोळे बंद केले आहेत. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला उन्हाने झाकले आहे.”

या फोटोवर मीराचा पती शाहिद कपूरने लिहिले आहे कि, “हुबेहूब जैनसारखी.” यावरून असं समजते की, त्यांचा मुलगा जैन हा अगदी मीरासारखा दिसतो.

मीरा राजपूत ही नेहमीच सोशल मीडियावर स्टाईल, हेल्थ, योगा आणि डाएटचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने शाहिद कपुर आणि आणि भाऊ ईशान खट्टर याच्यासोबत वर्कआउट करताना व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले होते. शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने २०१५ साली लग्न केले आहे. २०१६ मध्ये त्या दोघांना मुलगी झाली तिचे नाव मिशा असे आहे. तसेच २०१८ मध्ये त्यांना जैन नावाचा मुलगा झाला आहे. त्यांचे फोटो ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीने शेअर केला वाढदिवसाचा लेट नाईट पार्टी व्हिडिओ; सिद्धार्थनेही लावली हजेरी

-जरीन खानने स्टायलिश लूकमध्ये दाखवला तिचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज

-सॉफ्टवेअर इंजिनिअर, मिस इंडिया अन् आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री; वाचा तापसी पन्नूचा रोचक सिनेप्रवास

हे देखील वाचा