Friday, September 20, 2024
Home कॅलेंडर सॉफ्टवेअर इंजिनिअर, मिस इंडिया अन् आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री; वाचा तापसी पन्नूचा रोचक सिनेप्रवास

सॉफ्टवेअर इंजिनिअर, मिस इंडिया अन् आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री; वाचा तापसी पन्नूचा रोचक सिनेप्रवास

येण्याची इथे काम करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. काहींना या क्षेत्राची, इथे मिळणाऱ्या पैश्याची, प्रसिद्धी, ग्लॅमरची भुरळ पडते. तर काहींसाठी अभिनय हे त्यांचे पॅशन असते. अभिनय करणे हा काहींचा ध्यास असतो. या सर्व विभागात मोडणारे लोकं मुंबई नावाच्या मायानगरीत येतात आणि काम मिळवण्यासाठी हातपाय मारतात. मात्र यात प्रतिभा असूनही काहींना यश मिळत नाही. याचाच अर्थ ते हार मानतात असा बिलकुल नाही. प्रयत्न करत राहतात, एक ना एक दिवस त्यांना यश मिळतेच मिळते. या क्षेत्रात अनेक अभिनेत्री आहे, ज्यांना अभिनयाचा अ देखील जमत नाही.

फक्त सौंदर्याच्या जोरावर त्या या क्षेत्रात काम करतात. मात्र यासोबतच या क्षेत्रात अशा देखील अभिनेत्री आहे, ज्यांच्याकडे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही, त्यांचा अभिनय प्रभावी ठरतो. याच विभागतली एक अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. (taapasee pannu) आज दिग्दर्शक निर्मात्यांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांचीच आवडती अभिनेत्री म्हणून तापसी ओळखली जाते. तापसीने स्वबळावर तिचे या क्षेत्रात स्थान निर्माण केले आहे. आज तापसी तिचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिचा या क्षेत्रातील प्रवास.

तापसीचा जन्म १ ऑगस्ट १९८७ रोजी दिल्लीत झाला. तिने तिचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. पुढे गुरू तेगबहादूर इन्स्टिट्यूटमधून तापसीने कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर काही वर्ष तिने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम देखील केले. तापसीचे वडील दिलमोहन हे एका रिअल इस्टेट कंपनीत काम करायचे, तर आई निर्मलजीत गृहिणी आहे. तापसीला शगुन नावाची एक लहान बहीण देखील आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून तापसीने भारतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिने आठ वर्षे डान्सचे प्रशिक्षण घेतले. तापसी एक उत्तम स्क्वाश खेळाडू देखील आहे. शालेय जीवनात तापसी अभ्यासासोबतच खेळांमध्ये देखील पुढे असायची. अभ्यासात नेहमी पहिल्या पाचमध्ये तिचा नंबर यायचा. तापसीला कधीही पॉकेटमनी मिळाला नाही. तिला ज्या वस्तूंची गरज असायची, ते तिला घरचे आणून द्यायचे. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असताना एका टॅलेंट शोमध्ये तिने तिच्यातल्या अभिनयाच्या प्रतिभेचे सर्वाना दर्शन घडवले. (taapsee pannu birthday special)


या नंतर तापसीने व्ही चॅनलच्या टॅलेंट शो ‘गॉट गॉर्जियस’साठी ऑडिशन दिले आणि तिची यात निवड देखील झाली. त्यानंतर तापसीने फुलटाइम मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. तापसीने अनेक प्रिंट जाहिराती आणि टीव्हीच्या जाहिराती करत असतानाच २००८ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत ‘मिस फ्रेश’ फेसचा पुरस्कार जिंकला. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले.

तापसी पन्नू आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड चित्रपटांसह, साऊथ इंडियन चित्रपटांमध्येही तिने आपल्या भूमिकेची छाप सोडली आहे. २०१० सालानंतर तिने अभिनयात येण्याचे ठरवले. या पंजाबी कुडीने २०१० मध्ये राघवेंद्र रावच्या तेलगू सिनेमा ‘झुम्माण्डि नादां’ पासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला तिला यश मिळाले नाही. मात्र २०११ साली आलेल्या तामिळ चित्रपट “आडुकलम’मधून तिला खरी ओळख मिळाली. या सिनेमाला ५८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहा पुरस्कार मिळाले आणि तापसीला पहिले घवघवीत यश मिळाले. साऊथ सिनेमे करत असतानाच २०१३ साली तिने डेव्हिड धवन यांच्या कॉमेडी चित्रपट ‘चश्मेबद्दूर’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या सिनेमाचा तिला जास्त काही फायदा झाला नाही. मात्र २०१६ साली रिलीज झालेल्या शूजित सरकारच्या ‘पिंक’ सिनेमातून तिने कमर्शियल यश मिळवले. या सिनेमात तिचा प्रभावी आणि जिवंत अभिनय पाहून प्रेक्षकांसह समीक्षकही तिची स्तुती करत होते. मुख्य म्हणजे यात तिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. या सिनेमानंतर तापसीने कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘पिंक’ सिनेमाआधी ती २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बेबी’ चित्रपटात १० मिनिटांच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर याच सिनेमाचा सिक्वेल ‘नाम शबाना’मध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली.

तापसीने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय करत असताना अतिशय सहजरित्या चित्रपटांसाठी डबिंगही केले आहे. जाट सिख असलेल्या तापसीचे हिंदी आणि इंग्रजीही अतिशय प्रभावी आहे. २०१८ पासून आत्तापर्यंत फोर्ब्ज इंडिया १०० सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘सांड की आंख’साठी तिला पहिल्यांदा उत्कृष्ट कलाकार म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. तापसीने ‘बेबी’, ‘नाम शबाना’, ‘सूरमा’, ‘द गाजी अटैक’, ‘पिंक’, ‘मनमर्जियां’, ‘बदला’, ‘मुल्क’, ‘सांड की आंख’, ‘थप्पड़’, ‘मिशन मंगल’, ‘हसीना दिलरुबा’ आदी चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची ताकद सर्वांना दाखवली. कमर्शियल चित्रपटांसोबतच पठडीबाहेरील सिनेमे करण्यामध्ये तापसी अग्रेसर आहे.

Photo Courtesy Instagramtaapsee

जानेवारी २०१५ मध्ये तापसीला एका मुलाखतीत तिच्या रिलेशनशिपबद्दल विचारले होते. तेव्हा ती म्हणाली होती की, “मी एका साऊथ इंडियनला डेट केले, पण कोणत्याही स्टारला डेट केले नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते जेव्हा कधी मी रिलेशनशिपमध्ये असेन, तेव्हा त्यात मीच एकमात्र सेलिब्रिटी असेन. मी कोणत्याही कलाकारांना डेट करणार नाही. तापसी बॅडमिंटन खेळाडू मथायस बो याला डेट करत असल्याचे बोलले जात होते.

मागील काही काळापासून तापसी आणि कंगना यांचा सोशल मीडियावरील वाद चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळाले. तापसी बिझनेसवुमन देखील आहे. तिच्या बहिणीसोबत मिळून तिची स्वतःची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. ‘द वेडिंग फॅक्टरी’ नावाची ही कंपनी वेडिंग प्लांनिंगचे काम करते. काही दिवसांपूर्वीच तापसीचा ‘हसीना दिलरुबा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला चांगले यश मिळाले. लवकरच तापसी ‘शाबास मिठू’ हा भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन असणाऱ्या मिताली राजवर आधारित सिनेमात दिसणार आहे.

अधिक वाचा- 
श्वेता, डिंपीनंतर आता तिसऱ्या पत्नीलाही घटस्फोट देतोय राहुल महाजन? वाचा सविस्तर
भारीच ना! हॉरर कॉमेडीपट ‘सुस्साट’चे लंडनमध्ये शूटिंग सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा