Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड पडद्यावर इतक्या सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या सौंदर्यामागे ‘हे’ आहे रहस्य; एक नजर टाकाच

पडद्यावर इतक्या सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या सौंदर्यामागे ‘हे’ आहे रहस्य; एक नजर टाकाच

बाॅलिवूडच्या चित्रपटात जसे दिसते, तसे वास्तविक आयुष्यात जास्तकरून नसते, हे एक दुर्मिळ वास्तव आहे. चित्रपटामधे दिसणारे आलिशान आणि महागडे बंगले त्यांच्या स्वताचे नसतात. कोट्यावधी रुपये खर्च करुन बनावट महल किंवा बंगले बांधले जातात आणि शुटिंग संपल्यानंतर ते नष्ट केले जाते.

बॉलिवूड कलाकारांच्या सौंदर्याबाबतही असेच काहीसे आहे. दरम्यान, अभिनेते क्वचितच रुपेरी पडद्यावर खरेखुरे दिसतात. मात्र, बॉलिवूड कलाकारांसारखे दिसण्यासाठी बरेच लोक काहीही करायला तयार असतात. पण बॉलिवूड कलाकारांचे सौंदर्य कायमस्वरूपी नसते, कधीकधी त्यांच्यापेक्षा अधिक सुंदर सामान्य व्यक्ती असते. मग प्रश्न असा आहे की, अभिनेता किंवा अभिनेत्री पडद्यावर इतके सुंदर कसे दिसतात?

रियल लाईफमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्याचे रहस्य खुप वेगळेच असते. त्यांच्या सोंदर्याचे खरे गुपित कॅमेऱ्याच्या दडलेले असतात. रुपेरी पडद्यावरील कलाकारांची सुंदरता अनेकांच्या मनावर भुरळ घालते. पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेत्रींचा सर्व प्रथम प्रचंड मेकअप केला जातो आणि नंतर कॅमेऱ्यासमोर आणले जाते.

कलाकारांच्या सुंदर दिसण्यामागे मेकअप करणारे स्टाफ खूप मेहनत घेत असतात. यासाठी, आयशॅडोपासून फाउंडेशनपर्यंत, जे बारकाईने लावले जाते, त्यानंतरच अभिनेत्री पडद्यावर इतक्या सुंदर दिसतात. त्यांना पाहून प्रत्येकाला त्यांच्यासारखे दिसण्याची इच्छा होते. मेकअप आर्टिस्ट आपले काम इतक्या सुंदर पद्धतीने करतात, की कधीकधी बॉलिवूड अभिनेत्री देखील स्वतःमध्ये एवढा बदल पाहून आश्चर्यचकित होतात.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या मेकअपचे ‘हे’ फोटो पाहा
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर दिसणारी अभिनेत्री ऐश्वर्या राॅयचे सौंदर्य काही वेगळेच आहे. पण मेकअप आर्टिस्ट चित्रपटांमध्ये तिचे सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतात. तिच्या ओठांना सुंदर असा गुलाबी टच देण्यासाठी सुरेख कामही केले जाते. त्यामुळे ऐक्ष्वर्या सर्वं चाहत्यांची मने जिंकत असते.

बॉलिवूडमध्ये चेहऱ्यापासून मेकअपपर्यंत, असे वेगवेगळे काम करणारे आर्टिस्ट लोक आहेत. जसे की सनी लिओनीचे केस ठीक आणि स्टायलिश करण्यासाठी हेअर आर्टिस्ट खुप मेहनत करत असतात.

तसेच अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या प्रियांका चोप्राच्या सौंदर्याचे रहस्य अखेर उघडकीस आले आहे . तिच्या मेकअपसाठी देखील प्रचंड मेहनत घ्यावी लागते, असे आर्टिस्ट म्हणतात.

बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पडद्यामागे वेगळी दिसू शकते, पण प्रत्यक्ष पडद्यासमोर दिसताना तिचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा असतो. कारण तिच्या सुंदर चेहऱ्याचे रहस्य हे मेकअप आर्टिस्ट आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

हे देखील वाचा