बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या प्रत्येक गोष्टीमुळे चर्चेत असतात. त्यांचे कपडे, स्टाईल, बोलणे, चालणे किंवा त्यांची कोणतेही वस्तू का असेना. चाहते नेहमीच त्यांच्या या सगळ्या गोष्टींकडे आकर्षित होत असतात. बॉलिवूडची अत्यंत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा तिच्या प्रत्येक गोष्टीमुळे खूप चर्चेत असते. त्यात सोशल मीडियावर तर ती जरा जास्तच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अशातच तिने सर्वांचे लक्ष वेधणारे काही फोटो शेअर केले आहे. (nora fatehi’s animal printed bold photos viral on social media)
नोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती समुद्र किनारी दिसत आहे. तिने यामध्ये ऍनिमल प्रिंटेड ड्रेस घातला आहे. तिने ब्राऊन कलरचा ऍनिमल प्रिंटेड टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. यासोबतच तिने ड्रेसला मॅचिंग ऍनिमल प्रिंटेड कानातले घातले आहे. यामध्ये ती बोल्ड पोझ देताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती घोड्यासोबत दिसत आहे.
या फोटोमध्ये तिच्यासोबत काळ्या रंगाचा घोडा आहे आणि तिने हातात काळ्या रंगाची पर्स घेतलेली आहे. तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. तसेच हे फोटो मोठ्या संख्येने शेअर केले जात आहेत.
नोरा ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…
-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ
-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक










