काही सिनेमे किंवा सिरीज यांच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असते. ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यामुळे चांगल्या सिनेमांना, चांगल्या सिरिजला भाषेचे बंधन बिलकुल पडत नाही. कलाकृती चांगली असली की तिला नक्कीच प्रेक्षक डोक्यावर घेतात. सध्या वेबसिरिजला सुगीचे दिवस आले आहे आणि ओटीटी आल्यामुळे वेगवेगळ्या सिरीज अगदी लीलया सर्वांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे हिंदीसोबतच इतर अनेक भाषांमधील सिरीज अगदी आवडीने लोकं बघतात. अशीच एक सुपरहिट सिरीज म्हणजे ‘मनी हाईस्ट’. नुकताच या सिरीजच्या पाचव्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
नेटफ्लिक्सने २ ऑगस्ट रोजी बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट’ सिरीजचा पाचव्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या स्पॅनिश वेबसिरीजच्या पाचव्या सिझनची वाट फॅन्स कधीची बघत होते. कारण प्रोफेसर आणि त्यांची टीम अशा परिस्थितीत अडकली आहे, जिथून बाहेर पडण्याची कोणतीच आशा दिसत नाही. जे कोणी नाही बघू शकत तेच बघणाऱ्या प्रोफेसरच्या खेळींपुढे पोलीस देखील हारते. मात्र यावेळेस त्यांचा सामना मिलिट्रीसोबत होणार आहे. त्यामुळे प्रोफेसर यावेळेसही त्याच्या टीमला वाचवू शकतो का? (money heist trailer released)
Keeping calm is not an option.
THE #MONEYHEIST SEASON 5 TRAILER IS HERE ????#LCDP5 @lacasadepapel pic.twitter.com/Cov39xPwqK— Netflix India (@NetflixIndia) August 2, 2021
या ट्रेलरमध्ये अनेक सीन्स पाहून तुमची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. पाचव्या सीझनमध्ये जोस मॅनुअल सेडा खलनायकी साकारताना दिसणार आहे. तर प्रोफेसरची भूमिका स्पॅनिश अभिनेते अलवारो मोर्ते निभावतात आणि टोक्योची भूमिकेत सिलिन ओलिवियरा दिसते.
हा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ३ सप्टेंबरला पहिला भाग तर ३ डिसेम्बरला भाग २ प्रदर्शित केला जाणार आहे. मनी हाईस्टचे चार सिझन आले असून, ते सर्व नेटफ्लिक्सवर इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे.
एकेकाळी हा शो टीव्हीवर फ्लॉप झाला होता. २०१७ मध्ये स्पॅनिश भाषेत हा शो तयार करण्यात आला होता. हा शो टीव्हीवर एंटिना ३ चॅनेलवर प्रसारित झाला. सुरुवातीला त्याला खूप प्रेम मिळाले, मात्र नंतर तो फ्लॉप ठरला. या टीव्ही शोचे नेटफ्लिक्सने राइट्स घेतले आणि संपूर्ण जगात प्रदर्शित केले. आज हा शो सर्वात लोकप्रिय शोच्या यादींमध्ये गणला जातो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’