Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

मनोरंजन क्षेत्रात सध्या चित्रपटांपेक्षा टेलिव्हिजन मालिकांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सध्या मालिकांना जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. मागील एक वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे चित्रपटगृह बंद असल्याने सध्या प्रेक्षकांचा कल मालिकांकडे आहे. यातच झी मराठी या चॅनलला‌ प्रेक्षक जास्त प्रतिसाद देतात. पण मागील अनेक दिवसांपासून या चॅनलचा टीआरपी खूप कमी झालेला दिसत आहे. त्याच मुळेच की काय, पण झी मराठीवर अनेक नव्या मालिकांचे आगमन होणार आहे. झी मराठीवर एक नाही दोन नाही, तर एकुण पाच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सगळ्या मालिकांचे प्रोमो झी मराठीवर दाखवले आहेत. चला तर जाणून घेऊया या नवीन मालिकांबद्दल.

मन झालं बाजिंद
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेच्या प्रोमो पाहून हे जाणवत आहे की, सर्वांना प्रेमाच्या रंगात रंगवण्यासाठी ही मालिका सज्ज झाली आहे. ही मालिका २३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत वैभव चव्हाण आणि श्वेता खरात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तुझी माझी रेशीमगाठ
‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो प्रेक्षकांना खूप भावला आहे. या प्रोमोमध्ये एक लहान मुलगी एका मोठ्या मुलाला लग्न करण्यासाठी त्याच्याकडे काय काय आहे हे विचारत असते. तो मुलगा म्हणजे श्रेयस तळपदे आहे. तसेच त्याच्यासोबत या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दिसणार आहे. ही मालिका २३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता येणार आहे.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये एक मुलगी अनेक नाते संबंध आठवत पाठ करताना दिसत आहे. त्यामुळे तिच्याकडे बघून असे वाटत आहे की, कदाचित ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असावी. पण नंतर तो सांगते की, मी लग्नाची तयारी करत आहे. ती मुलगी म्हणजे अभिनेत्री अमृता पवार. पण या मालिकेत आणखी कोणते कलाकार असणार आहे. याची माहिती समोर आली नाही. ही मालिका ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता येणार आहे.

मन उडू उडू झालं
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो पाहूनच प्रेक्षकांना मालिकेची आस लागली आहे. याचे कारण म्हणजे मालिकेच्या मुख्य भूमिकेत असणारी सर्वांची आवडती अभिनेत्री हृता दुर्गुळे. या मालिकेत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत दिसणार आहे. ही मालिका ३० ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

ती परत आलीये
‘ती परत आलीये’ या मालिकेचे ३ प्रोमो प्रदर्शित झाले आहे. प्रोमोवरून ही एक थ्रिलर मालिका असणार आहे, याचा प्रेक्षकांना अंदाज आला आहे. या मालिकेत एक बाबा इथे भूतं येतात अस सांगत असतात. ते इतरांना घाबरु नका असे सांगत असतात. पण ते स्वतःचं खूप घाबरले असतात. ही मालिका १६ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री १०: ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मागील अनेक दिवसांंपासून झी मराठीवरील अनेक मालिकांचा टीआरपी कमी झाला आहे. यात ‘देवमाणूस’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘कारभारी लयभारी’, ‘माझा होशील ना’ या मालिका संपण्याच्या वळणावर येऊन थांबल्या आहेत. त्यामुळे आता नवीन मालिका यांच्या जागा घेणार असल्याचे दिसून येत आहेत. प्रेक्षक देखील या मालिकांच्या प्रतीक्षेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा