टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा होस्ट आणि गायक म्हणजे आदित्य नारायण. आदित्य नारायणला त्याच्या आयुष्यात त्याचे वडील उदित नारायण यांच्याप्रमाणे एक यशस्वी गायक बनायचे होते. तो सिंगिंग सोबत अनेक शो आणि इव्हेंट होस्ट करायला लागला. तो सध्या सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल’ हा शो होस्ट करत आहे. त्यामुळे तो सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याने अनेक गाणी देखील गायली आहेत. एक चांगला गायक असूनही त्याला काम मिळत नव्हते. त्याने नुकतेच याबाबत त्याचे दुःख व्यक्त केले आहे.
तुम्हा सर्वांना ‘गोलियो की रासलीला : रामलीला’ या चित्रपटातील ‘ततड ततड’ हे गाणे तर आठवतच असेल. या गाण्यात रणवीर सिंगने धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. हे गाणे आदित्य नारायणने गायले होते. हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला काम मिळण्याची खूप अपेक्षा होती. पण असे काहीच झाले नाही.
नुकतेच त्याने इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. त्याने सांगितले की, “माझे ततड ततड हे गाणे खूप हिट झाले होते. यानंतर मला असे वाटले होते की, माझे आयुष्य खूप सोप्पे होऊन जाईल. परंतु हिट गाणे देऊनही मला काम मिळाले नाही. मी घरात हातावर हात ठेवून बसू शकत नव्हतो. मग मी टेलिव्हिजनमध्ये पाऊल ठेवले. जेव्हा ए.आर. रहेमानची नजर माझ्यावर पडली, तेव्हा त्याने मला ‘दिल बेचारा’ या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. विशाल शेखरने मला ही ऑफर दिली होती.” (after success of the song tattad tattad aditya narayan did not get any work then took a big step)
आदित्यने सिंगिंग आणि होस्टिंगसोबत अभिनय देखील केला आहे. त्याने ‘शापित’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात अभिनयासोबत त्याने गाणी देखील गायली होती. आता त्याने इंडस्ट्रीमध्ये त्याची खास जागा बनवली आहे. तो आता ‘इंडियन आयडल १२’ हा शो होस्ट करत आहे. ज्याचा ग्रँड फिनाले १५ ऑगस्टला होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…