Thursday, January 22, 2026
Home मराठी ‘शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट!’ म्हणत प्रसुतीनंतर प्रथमच सोशल मीडियावर व्यक्त झाली उर्मिला निंबाळकर

‘शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट!’ म्हणत प्रसुतीनंतर प्रथमच सोशल मीडियावर व्यक्त झाली उर्मिला निंबाळकर

नुकतेच काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि यूट्यूबर उर्मिला निंबाळकर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली होती. तिने या आधी तिच्या डोहाळेजेवणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच तिने डिलिव्हरीनंतर एक भली मोठी पोस्ट केली आहे.

उर्मिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती रुग्णालयात असून तिच्या हाताला सलाईन देखील लावलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, “अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्त्रियांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यातही तिची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. माझं सी-सेक्शन झालं. डिलिव्हरीनंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत पण तरीही सीझर होण्याची माझी कारणे खालीलप्रमाणे-

१. माझ्या ओटीपोटाचे/कंबरेचे हाड/साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते.
बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भार्रपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतला तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते.
यांचे कारण अनुवंशिकता.

२. बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली, जी इमर्जन्सी नव्हती. पण त्यामुळे त्याला बाहेर येणे किंवा खाली घसरणे केवळ अशक्य होते. प्रेग्नेंसी डाएट, प्रेग्नेंसीमधील व्यायाम हे चोख पार पाडून मीही नॉर्मल डिलिव्हरी होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि नॉर्मलसाठीच प्रयत्न करायला हवा. परंतु कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलीव्हरीही तितकीच नॉर्मल आणि नैसर्गिक आहे. त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. नॉर्मल असो वा सी-सेक्शन बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे.” (urmila nimbalkar share her first post after delivery)

तिच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते आणि कलाकार कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत. तसेच ती खूप धाडसी आहे, असे सगळे म्हणत आहेत,

उर्मिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘दुहेरी’, ‘एक तारा’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

हे देखील वाचा