टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपण अनेक असे शो पाहिले ज्यांनी लोकांना भरपूर पैसे मिळवून दिले. अनेक शो फक्त काही दिवस आले आणि नंतर त्यांचे दुकान बंद झाले. कारण काहीही असले तरी हे शो पुन्हा पाहायला मिळाले नाही. यासर्वांमधे आपले वेगळेपण, नावीन्य टिकविणारा एकच शो मागील १३ वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे, आणि तो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती 13’. या शोने लोकप्रियतेचे उच्चांक गाठत अमिताभ बच्चन यांना देखील एक वेगळी ओळख दिली.
दरवर्षी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. २०२१ वर्ष सुरु झाले तशी पुन्हा ‘कौन बनेगा करोडपती13’ पुन्हा कधी सुरु होणार यावर चर्चा सुरु झाल्या. १० मे पासून या शोच्या नवीन पर्वाचे रजिस्ट्रेशन सुरु झाले, आणि लोकांच्या आशा पल्लवित झाल्या. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर शो टीव्हीवर कधी झळकणार याच्या चर्चा सुरु झाल्या. आता ‘केबीसी १३’चे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून, हा शो याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Kaun Banega Crorepati 13 Start From 23 August)
हा शो कधी सुरु होणार याची अधिकृत माहिती सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. केबीसीच्या तिसऱ्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करत सोनीने हा शो येत्या २३ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचे सांगितले आहे.
या पर्वाच्या प्रमोशनसाठी केबीसीच्या टीमने ‘सन्मान’ नावाची एक शॉट फिल्म तयार केली. ही शॉर्ट फिल्म तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. दोन भाग आधीच प्रदर्शित झाले असून त्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आता या फिल्मचा तिसरा आणि शेवटचा भाग सोनी टीव्हीने प्रदर्शित करत त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “पहिल्या आणि दुसऱ्या भागाला दिलेल्या प्रेमासाठी सर्वांचे आभार. आम्ही तुमच्यासमोर या तीन भागातील फिल्मच्या सिरीजचा तिसरा आणि शेतवचा भाग सादर करत आहे. विसरू नका ‘कौन बनेगा करोडपती13’ २३ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सुरू होणार आहे.
या फिल्मच्या सिरिजला ‘दंगल’ फेम नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केले आहे. या शोचे हे भलेही १३ वे पर्व असले तरी शो यावर्षी २१ वर्ष पूर्ण करत आहे. मधले १/२ पर्व सोडले तर अमिताभ बच्चनच हा शो होस्ट करत आहे. आता या शोची ओळखच अमिताभ बच्चन बनले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल










