Friday, March 29, 2024

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या मदतीसाठी धावणारा अभिनेता म्हणजे कोण?, असा प्रश्न विचारल्यावर सर्वांच्या मुखात एकच नाव येतं ते म्हणजे सोनू सूद होय. त्याने कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक मजुरांना आपापल्या घरी जाण्याची सोय करून दिली होती. त्याच्या या कामगिरीमुळे चाहत्यांच्या मनातील त्याचे स्थान अजून अढळ झाले. अजूनही तो आपले काम करतच आहे. तो एक चांगला अभिनेताही आहे. त्याचे अनेक चित्रपट पडद्यावर हिट होतात. त्याचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता त्याचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत अभिनेत्री निधी अग्रवालही आहे. यामध्ये एक मजेशीर ट्विस्टही पाहायला मिळतो, जो पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल

या व्हिडिओत दिसते की, सोनू सूद जसा निधीसोबत ‘तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे’ गाण्यावर डान्स करण्यासाठी जातो, तसा तिथे त्यांच्या मध्ये एक चाहता येतो आणि सेल्फी घेऊ लागतो. यादरम्यान सोनू त्याला चांगलाच धडा शिकवतो. यावेळी त्याची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. (Actor Sonu Sood Danced With Niddhi Agerwal On The Song of Tum To Thehre Pardesi Video Goes Viral)

व्हिडिओ पाहून चाहते लोटपोट होत आहेत. हा व्हिडिओ निधीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ८ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहे. तसेच लाखो लाईक्सचा पाऊस पडला आहे.

खरं तर ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे गाणे ९० च्या दशकातील अल्ताफ राजांनी गायलेले प्रसिद्ध गाणे आहे. याच गाण्याचा रिमेक करत सोनू सूद आणि निधी अग्रवाल यांनी नवीन व्हिडिओ गाणे तयार केले आहे. त्यांच्या गाण्याने एकाच दिवसात १९ लाख लाईक्सचा टप्पा पार केला होता.

हे नवीन गाणे अल्ताफ राजा आणि टोनी कक्कर यांनी गायले आहे. हा व्हिडिओ शेअर करत निधीने या गाण्यावर रील्स व्हिडिओ बनवण्याचे आवाहनही केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका, कॅटरिना आणि आलिया हे त्रिकुट निघणार रोड ट्रीपवर, फरहान अख्तरने केली पुढच्या सिनेमाची घोषणा

-सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे कौतुक करताना केलेल्या ट्विटमुळे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल

-करीना कपूर खानने प्रेग्नेंसी दरम्यानच्या ‘सेक्स लाईफ’बद्दल केला खुलासा; म्हणाली, ‘त्यावेळी सैफ खूप…’

हे देखील वाचा