Wednesday, February 5, 2025
Home भोजपूरी भोजपुरीच्या सावन स्पेशल गाण्यांची इंटरनेटवर धूम; ‘लेला ये बम हमरो अर्जी’ बोलबम गाणे झाले प्रदर्शित

भोजपुरीच्या सावन स्पेशल गाण्यांची इंटरनेटवर धूम; ‘लेला ये बम हमरो अर्जी’ बोलबम गाणे झाले प्रदर्शित

हिंदी आणि पंजाबी गाण्यांना भोजपुरी गाणे तोडीस तोड टक्कर देताना दिसत आहे. भोजपुरी गाण्यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये नावीन्य राखत प्रेक्षकांची आवड ओळखली आणि त्यानुसार गाणी तयार केली, कदाचित त्याचमुळे ही गाणी आज सुपरहिट होत आहेत. अतिशय लक्षवेधी आणि हटके शब्द, आकर्षक संगीत आणि उडती चाल हे या गाण्याची वैशिष्ट आहेत.

अगदी दररोजच एक तरी भोजपुरी गाणे प्रदर्शित केले जाते. रोज प्रदर्शित होऊनही ही सर्वच्या सर्वच गाणी तुफान प्रसिद्ध होतात. या गाण्याची शूटिंग परदेशातही केली जाते. यावरूनच भोजपुरी गाण्याची लोकांमध्ये असणारी लोकप्रियता लक्षात येते. या गाण्यांच्याच जोरावर अनेक साधे कलाकार आज सुपरस्टार या यादीत सामील झाले आहेत. (bhojpuri sawan special song lela ae bum hamro arji)

भोजपुरीमधील हँडसम अभिनेता राज यादव आणि प्रसिद्ध लोकगायक रोहित रुद्र यांची जोडी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या दोघांचे एक बोलबम गीत प्रदर्शित झाले आहे. गाण्यांचे नाव आहे, ‘लेला ए बम हमरो अर्जी’. य वागण्याला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे किंबहुना मिळत आहे. या व्हिडिओ गाण्याला वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

हे गाणे अतिशय भावुक आणि हृदयस्पर्शी असून, यात एक दुःखद गोष्ट दाखवण्यात आली आहे. या गाण्यात राज यादव दिसत असून, रोहित रुद्राने त्याच्या आवाजात गाणे गायले आहे. गाण्यात राजसोबतच रोहितची दिसत आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद देत यूटुबवर तशा कमेंट्स देखील केल्या आहेत.

वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरीची प्रस्तुती असणाऱ्या ‘लेला ए बम हमरो अर्जी’ या गाण्याचे शब्द कवी प्यारेलाल यादव यांनी लिहिले असून, संगीत साजन मिश्रा यांनी दिले आहे. अनुप गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्याचे धीरज ठाकूर सहदिग्दर्शक आहे.

आजच्या घडीला भोजपुरीमधील अनेक बोलबम गाणे यूटुबवर धमाका करत आहेत. या गीतांमध्ये नुकतेच खेसरी लाल यादवचे सावन स्पेशल ‘हनुमान गेयर’का व्हिडिओ भरपूर गाजत आहे. जास्तकरून भोजपुरी प्रेक्षकांमध्ये ही गाणी खूपच लोकप्रिय ठरत आहे. पहिल्याच दिवशी या गाण्याला लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्याला खेसरी लालने त्याच्या आवाजात गायले असून, अखिलेश कश्यपने गाणे लिहिले आहे. तर आर्या शर्मा यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा