मराठी सिनेसृष्टीत आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडेकेकर होय. तिचे फोटोशूट्स बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सदैव पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर करून ती चाहत्यांचे हृदय चोरते. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने तिने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. नुकतीच अभिनेत्रीने शेअर केलेली एक पोस्ट आणि सोबतच त्यावर तिचा पती अभिजित खांडकेकरने केलेली कमेंट बरीच चर्चेत आली आहे.

सुखदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने पारंपारिक वेशभूषा केली आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने तपकिरी रंगाची साडी परिधान केली आहे. शिवाय यात तिने साध्या वेशभूषेसह अतिशय साधा मेकअप केला आहे. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली आणि बांधलेले केस एकंदरीत या लूकमध्ये सुखदा खूपच सुंदर दिसत आहे.

सुखदाच्या या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत, हे फोटोवरील कमेंट्सने सहज आपल्या लक्षात येईल. विशेष म्हणजे अभिजित खांडकेकरनेही तिच्या या फोटोवर लक्षवेधी कमेंट केली आहे. फोटोवर कमेंट करत अभिजित म्हणतोय की, “सैया घर कब आओगे.” सुखदाची फोटोतील पोझ पाहून अभिजितला ही कमेंट सुचली असावी.

सुखदा आणि अभिजित हे सिनेसृष्टीतले रोमँटिक जोडपे आहे. बऱ्याचदा हे जोडपे त्यांचे कपल फोटोशूट शेअर करत असते. सुखदाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘आभास हा’, ‘घरकुल’ यासारख्या मालिकेमध्ये दिसली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मध्ये तिने मल्हाररावांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय सुखदा ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…










