Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ट्रोलर्सच्या कमेंट्सवर दु:खी होते बिग बींची नात नव्या नवेली नंदा; म्हणाली, ‘मला नको असले, तरीही…’

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने स्वतःला चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवले आहे. असे असूनही, नव्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नव्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती ट्रोलर्सचा सामना कसा करते.

ती म्हणाली की, तिला सहसा असभ्य अशा टीकांकडे दुर्लक्ष करायला आवडते, परंतु काही टीका पाहिल्यानंतर ती स्वत:ला थांबवू शकत नाही आणि त्यांच्यावर आपली प्रतिक्रिया देत असते. (Big B’s granddaughter, the newcomer Nanda, gave a blunt answer to the critics, he said)

नव्या नवेली नंदा ही अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी ‘हर सायकल’शी बोलताना ती म्हणाली होती की, “कधीकधी सर्वात मोठा प्रश्न असा होतो की, मी या टीकांना उत्तर द्यायचे की दुर्लक्ष करायचे. परंतु कधीकधी असे घडते की, मला नको असले, तरीही मला काही कमेंट्सना उत्तर द्यावे लागते. ज्या मला खरोखरच आतून हादरवून टाकत असतात. मला अजूनही एक घटना आठवते, त्या कमेंट्सने मला खरोखर अस्वस्थ केले होते. मी एका मुलाखतीत सांगितले होते की, मला कशी माझ्या आईने प्रेरणा दिली होती. कारण ती एक काम करणारी महिला आहे. कोणीतरी माझ्यावर टीका करत विचारले होते की, ती काय करते? त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती की, ती आई आहे आणि ती एक आई असणे ही पूर्णवेळ नोकरी आहे.”

त्याचबरोबर ती पुढे म्हणाली की, “जेव्हा मी अशा गोष्टी वाचते ज्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, तेव्हा या गोष्टींशी मी कधीच सहमत नसते. कारण मला वाटते की, आई होणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे आणि याची आम्ही प्रशंसा करत नाही. तिला असे कोणतेही श्रेय देऊ नका. घरातील सर्व लोकांना वाढवण्याची आणि त्यांना अधिक चांगले बनवण्याची जबाबदारी आईची असते. लोक तिच्या कामाला काम मानत नाहीत, कारण ती कोणत्याही कंपनीत लाखो- कोटी कमवत नाही.”

नव्या नवेली नंदाला बॉलिवूडमध्ये आपले करिअर करायचे नाही, कारण तिला तिच्या आई आणि वडिलांसारखा व्यवसाय करायचा आहे आणि नाव कमवायचे आहे. मागील काही दिवसांपूर्वीच नव्याने इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता, जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आणि तिला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा सल्लाही दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा