Wednesday, March 27, 2024

या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्यामुळे आणि ते ऍपवर प्रदर्शित केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर’च्या चौथ्या हंगामाचे सतत शूटिंग करताना दिसली नाही. सध्या शिल्पा या शोचा एक भाग आहे की, नाही याबाबत कोणताही खुलासा झाला नाही. राज कुंद्राला गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी दीर्घ चौकशी केल्यानंतर अटक केली आहे. त्याचा थेट परिणाम शिल्पा शेट्टीच्या कामावर झालेला दिसून येत आहे.

शिल्पा शेट्टी सुपर डान्सरच्या शोमध्ये दिसली नाही
गीता कपूर उर्फ गीता मा आणि अनुराग बसू यांच्यासह अभिनेत्री शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोची जज आहे. परंतु गेल्या चार आठवड्यांपासून ती या शोमध्ये दिसली नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, शिल्पा याही आठवड्यात शोमध्ये दिसणार नाही. पण यावेळी एक विशेष पाहुणे शोमध्ये तिची कमतरता भरून काढण्यासाठी येणार आहेत. (The superhit duo will be seen on the stage of Super Dancer in the movie ‘Tridev’)

जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी विशेष अतिथी
सध्या ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये मागील दिवसांपासून शिल्पा शेट्टीने दिसत नाही. त्यामुळे काही सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या शोमध्ये दिसले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी या आठवड्यात पाहुणे म्हणून ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये दिसणार आहेत. असेही सांगितले जात आहे की, संगीता बिजलानी आणि जॅकी श्रॉफ स्टेजवर मजा करताना दिसणार आहेत.

जुन्या गाण्यांवर करणार डान्स
‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या मंचावर जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी डान्स करणार आहेत. सोबतच त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी यांचे ‘त्रिदेव’या चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘गजरा ने किया है इशारा’, ‘घडी भर का है खेल सारा’, आणि ‘गली-गली में फिरता’ या गाण्यांवर डान्स करणार आहेत.

स्पर्धकांसोबत करतील खूप मजा
नेहमी मुलांसोबत मजा करणारे जॅकी या खास प्रसंगी स्पर्धकांसोबत नाचताना दिसणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धक पृथ्वीराजला बाईकवर चक्कर देखील मारणार आहेत. आतापर्यंत या शोमध्ये करिश्मा कपूरपासून रितेश- जेनेलियापर्यंत आणि नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये मौसमी चॅटर्जी आणि सोनाली बेंद्रे यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.

शिल्पाच्या हातातून अनेक मोठे प्रोजेक्ट्स जातील
राज कुंद्राच्या अटकेचा परिणाम थेट त्याची पत्नी शिल्पा शेट्टीच्या कारकिर्दीवरही होत असताना दिसत आहे. या घटनेनंतर शिल्पा शेट्टीच्या हातातून अनेक मोठे प्रकल्प निसटून जात आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, राज कुंद्रा वादानंतर ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या निर्मात्यांनी शिल्पाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, अजून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. याच्या व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांचे ब्रँड एंडोर्समेंट्सही तिच्या हातातून निसटून जात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा