Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत नेहमीच तिच्या निर्भिड अंदाजासाठी ओळखली जाते. कंगना तिचे मत मांडताना कधीच मागेपुढे पाहत नाही. अभिनेत्री सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे बरीच चर्चेत आहे. अलीकडेच तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अशातच कंगनाने रॅप अप पार्टीचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले.

कंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि रोज ती काही ना काही पोस्ट करत राहते. कंगना आगामी ‘धाकड’ चित्रपटात पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये दिसणार आहे. अशामध्ये तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (kangana ranaut shared a photo in a bold look users took class)

कंगनाने दाखवला बोल्ड अवतार
कंगनाने तिचे फोटो शेअर केले आहेत, त्यात ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. कंगनाच्या फोटोंमध्ये बॅकग्राउंडला सूर्यास्त दिसत आहे. हे फोटो पाहून असे वाटत आहे की,  अभिनेत्री एका तलावाच्या काठावर उभी आहे.

हे देखील वाचा