आज बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजय खान यांचा वाढदिवस. संजय आज त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा करत आहे. संजय यांनी त्यांच्या आयुष्यातील ५५ वर्ष चित्रपटसृष्टीला दिले. त्यांनी १९६४ साली ‘हकीकत’ या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. तीन दशकाच्या करियरमध्ये त्यांनी जवळपास ३० चित्रपटात काम केले. त्यांनी फक्त मोठा पडदा नाहीत तर छोटा पडदा देखील गाजवला.
१९९० साली संजय यांनी दूरचित्रवाणीवरील ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ मालिकेत टिपू सुलतान हि मध्यवर्ती भूमिका साकारली होती. संजय खान यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले.
‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ या मालिकेची शूटिंग सुरु होती. सेटवर सुमारे ४० जणं उपस्थित होते. अचानक या मालिकेच्या सेट ला ८ फेबुवारी १९९० ला मोठी आग लागली. हि आग इतकी भयंकर होती की या आगीत संजय खान हे ६५ टक्के भाजले गेले. ही आग इतकी मोठी होती की या आगीत भाजले गेलेल्या संजय यांच्यावर १३ दिवसात ७३ सर्जरी करण्यात आल्या.
एका मुलाखतीदरम्यान संजय यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, मला कधीच वाटले नव्हते की अशी घटना घडेल. त्यादिवशी मी लेखकासोबत स्टुडिओ बाहेर चर्चा करत होतो, अचानक जोरजोरात ओरडायचे आवाज येऊ लागले. म्हणून आम्ही आत गेलो, पहिले तर चहूबाजूला आग लागली होती. मी ओरडत होतो की दरवाजे उघडा, तेवढ्यात माझ्या डोक्यावर काहीतरी येऊन पडले. पुढचे तर सर्वांना माहीतच आहे.”
एवढी मोठी घटना घडून देखील संजय या गोष्टीतून खूप लवकर बरे झाले. हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ते बरे झाल्यावर डॉक्टरांनी संजय यांना अभिनय सोडण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी असे न करता त्यांच्या भावाचा अकबर खानचा प्रोडक्शचा उद्योग सांभाळला.
संजय खान हे नेहमीच एक नशीबवान व्यक्ती ठरत आले. कारण त्यांच्या सोबत अशा जीवघेण्या घटना अनेकदा झाल्या आहेत. एकदा ते म्हैसूरला जाताना त्यांचे प्लेन क्रॅश झाले होते. सुमारे ८०० मीटर उंचीवर ते प्लेन खाली पडले त्यात ५५ लोक मृत झाले, मात्र संजय सुदैवाने पुन्हा वाचले.
अशा या फायटर अभिनेत्याला दैनिक बोंबाबोंब कडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.










