बॉलिवुडमधील कलाकार हे जितके त्यांच्या अभिनयसाठी लोकांमध्ये प्रसिद्ध तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्तच त्यांच्या पर्सनल आयुष्यासाठी ओळखले जातात. असं म्हणतात, बॉलिवुडमध्ये कलाकारांचे लग्न झाले की त्यांचे करियर संपायला सुरूवात होते, खासकरून अभिनेत्रींसाठी हा नियम खूपच जास्त लागू होतो. मात्र ८०/९० च्या दशकात हा नियम अभिनेते, अभिनेत्री या दोघांनाही लागू होता. लग्नानंतर कलाकारांच्या लोकप्रियतेत घट होते असा समज होता. त्यामुळे अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांचे लग्न झाल्याचे अनेक वर्ष लपवून ठेवले होते. पाहूया अशाच काही कलाकारांची नावे.
आमिर खान:
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने बॉलिवुडमध्ये १९८८ साली ‘कयामत से कयामत तक’ सिनेमातून एन्ट्री केली. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच १८ एप्रिल १९८६ मध्ये आमिर खानने रीना दत्तासोबत लग्न केले. रीनाने आमिरच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच ‘कयामत से कयामत तक’ मध्ये एक छोटासा रोल देखील केला होता. आमिरने रीनासोबत केलेले लग्न अनेक दिवस त्याच्या परिवारापासून देखील लपवले होते. पण नंतर काही काळाने त्याच्या परिवाराला ही गोष्ट समजली, आणि त्यांनीच आमिरला त्याचे लग्न लपवण्यास सांगितले. कदाचित त्याच्या लग्नामुळे आमिरच्या करियर परिणाम होईल या भीतीने त्यानी त्याला हा सल्ला दिला. मात्र आमित्रचे हे लग्न २००२ साली तुटले. आमिर व रिनाने घटस्फोट घेतला. त्या दोघांना इरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत जी रीनाजवळ असतात.
राखी सावंत:
बॉलिवुडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंतने देखील अचानक तिचे काही वधूच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. फक्त फोटोशूट केल्याचे त्यावेळी राखीने सांगितले होते, मात्र काही दिवसांनी तिने एका एनआरआय असलेल्या रितेश नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचे काबुल केले. राखीने २८ जुलै २०१९ रोजी लग्न केल्याचे सांगितले होते. पण आजपर्यंत रितेशचा कोणताच फोटो माध्यमांसमोर आला नाहीये. राखीच्या या लग्नाला अजूनही काही लोकं पब्लिसिटी स्टंट समजतात.
गोविंदा :
९० च्या दशकातील लोकप्रिय सुपरस्टार गोविंदाने देखील त्याचे लग्न बरेच वर्ष लपवून ठेवले होते. गोविंदाने १९८६ साली दिग्दर्श आनंद सिंग यांच्या तन-बदन यासिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात एन्ट्री घेतली. याच सिनेमाच्या दरम्यान गोविंदाची भेट आनंद यांच्या सालीशी सुनीताशी झाली. काही काळाने या दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी ११ मार्च १९८७ रोजी लग्न केले. तेव्हा नुकतेच बॉलिवुडमध्ये एन्ट्री घेणाऱ्या गोविंदाने करियरसाठी ही गोष्ट अनेक वर्ष लपवून ठेवली होती.
अर्चना पूरन सिंह :
खळखळून हसणारी आणि अनेक कॉमेडी शोच्या मंचावर हमखास दिसणारी मिस ब्रिगेन्झा म्हणजेच अर्चना पूर्ण सिंग हिने देखील तिचे आणि परमित सिंगचे लग्न चार वर्ष लपवून ठेवले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलेल्या या दोघांनी त्यांचे लग्न परिवारापासून आणि माध्यमांपासून लपवले होते.
जुही चावला :
हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला हिने १९९५ साली प्रसिद्ध यशस्वी उद्योगपती जय मेहता यांच्यासोबत लग्न केले. जुहीने एकदा याबद्दल सांगितले होते की, ” माझे लग्न झाले तेव्हा मी माझ्या करियरच्या हाय पॉइंटला होती. लग्न केल्याचे समजले असते तर कदाचीत करियरवर परिणाम झाला असता म्हणून मी ही गोष्ट लपवून ठेवली. आम्ही जेव्हा लग्न केले तेव्हा मोबाईल मध्ये कॅमेरा नसल्याने लग्न लपवणे सोपे झाले होते.
अरहान खान :
बिग बॉसच्या १३ व्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत घरात जाणारा अरहान खान आणि रश्मी देसाई रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा अरहानचे असेच एक लग्न झाले होते आणि त्याला मुलगा देखील होता. मात्र त्याने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली होती. अगदी रष्मीलाही याबद्दल माहित नव्हते. बिग बॉसमध्ये सलमान खानने अरहानच्या लग्नाबद्दल सांगितल्यावर सर्वाना धक्का बसला. तेव्हापासूनच रश्मी अरहान वेगळे झाले.
पवित्रा पुनिया :
सध्या बिग बॉस १४ च्या घरात पवित्रा आणि एजाज यांची जवळीक खूप वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या येत आहेत. मात्र पवित्रा बिग बॉसच्या १३ व्या पर्वातील स्पर्धक पारस छाबडा सोबत अनेक दिवस रिलेशनशिप मध्ये होती. पवित्राने पारसला तिची लग्नाची कोणतीही कल्पना दिली नव्हती, एक दिवस अचानक पारसला पावित्र्याच्या नवऱ्याचा कॉल आल्याने त्याला तिच्या लग्नाबद्दल समजले..
दिव्या भारती :
९० च्या दशकात दिव्या भरती अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. वयाच्या १९ व्या वर्षी दिव्याने या जगाचा निरोप घेतला. दिव्या तीच्या घराच्या इमारतीवरून पडून मृत झाली. मात्र तिच्या मृत्यूची चौकशी करताना पोलिसांना समजले होते की, दिव्याने १९९२ साली दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केले होते. करियरच्या दृष्टीने तिने ही गोष्ट लपवली होती.
अंगद हासिजा :
सपना बाबूल का बिदाई फेम अभिनेता अंगद हासिजाने देखील स्टारडम आणि फॅन फॉलोविंग जाण्याच्या भीतीने त्याचे लग्न लपवले. २००७ साली त्याने परमित हासिजा सोबत लग्न केले असून आज त्यांना एक मुलगी आहे.










