आपल्या देशात कलाकारांबद्दल सर्वात जास्त क्रेझ दिसून येते. कलाकरांना आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे अनेक फॅन्स, प्रेक्षक आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतील. काही फॅन्सतर कलाकारांच्या सह्या, फोटो त्यांच्याजवळ आठवण म्हणून ठेवतात. आता जसा काळ बदलला, तसे या गोष्टींमध्ये बदल होत कलाकारांसोबतचे सेल्फी, त्यांच्या वस्तू संग्रही ठेवण्याचा ट्रेंड सुरु झाला. आता तर कलाकार चांगल्या कामांना मदत म्हणून किंवा एखाद्या एनजीओला मदत म्हणून त्यांच्या वापरलेल्या वस्तूंचा लिलाव करतात आणि आलेल्या पैशातून ते अनेक चांगली कामं करतात. फॅन्सदेखील त्यांच्या या वस्तू आनंदाने घेतात.
आता बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील तिचे कपडे लिलावासाठी काढले आहे. तिच्या या कपड्यांच्या लिलावातून मिळणार पैसा ती तिच्या ‘लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशन’साठी वापरणार असल्याचे सांगितले जात आहे. तिचे फॅन्स तिच्या या कामासाठी दीपिकाचे कौतुक करत असताना आता याच कारणामुळे दीपिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. दीपिकाने जे कपडे लिलावासाठी काढले आहे, ते कपडे पाहून आता काही प्रश्न उपस्थित होत आहे. (deepika padukone auctions her clothes)
I am so shocked.. my favourite Deepika Padukone has auctioned her non couture clothes from 2013.. I repeat 2013 that she wore to different funeral events. ????????
Low blow! pic.twitter.com/2vFPoVEeWV— Maya (@Sharanyashettyy) August 16, 2021
सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी दावा केला आहे की, दीपिकाने जे कपडे लिलावासाठी काढले आहे, ते कपडे तिने जिया खान आणि प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या अंतिम दर्शनावेळी घातले होते. एकाने सोशल मीडियावर दीपिका आणि तिच्या कपड्यांचे फोटो शेअर करत लिहिले, “मी खूपच हैराण आहे, की माझ्या आवडत्या दीपिकाने 2013 चे ते कपडे लिलाव केले आहे जे डिझायनर नाहीये. 2013 साली तिने वेगवेगळ्या अंतिंद्रशनावेळी हे कपडे घातले होते.”
या मेसेजवर अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. यासर्व नकारात्मक कमेंट्स असून, लोकांनी दीपिकाच्या या कृत्याला चुकीचे सांगितले आहे. मात्र या सर्व प्रकारच्या किती तथ्य आहे, हे अजूनही स्पष्ट नाही. अजून एका यूजरने लिहिले, “तू हे चॅरिटीचे स्पष्टीकरण देऊन ही गोष्ट आता स्पष्ट करू नको. कारण तू जाराच्या चप्पला आणि 10/15 वर्षांपूर्वीचे साधारण ब्रँडचे कपडे विकून असे काही करू शकत नाही. तू हे एखाद्या गरजूला देखील देऊ शकते.”
दीपिकाने ‘लिव्ह, लव्ह, लाफ’ या फाउंडेशनची स्थापना 2015 साली केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून ती नैराश्यात गेलेल्या लोकांची मदत करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
Gehraiyaan | दीपिका पदुकोणला किस करण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदीने घेतली होती रणवीर सिंगची परवानगी?
दीपिका पदुकोणला वयाच्या १८व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांटचा दिला होता सल्ला, अभिनेत्रीने म्हणाली ‘सर्वात वाईट…’