×

Gehraiyaan | दीपिका पदुकोणला किस करण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदीने घेतली होती रणवीर सिंगची परवानगी?

सध्या चित्रपट क्षेत्रात सर्वत्र दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ‘गहराइयां’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त लोकप्रिय ठरला नसला तरी चित्रपटातील दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या (Siddhant Chaturvedi) बोल्ड सीनची मात्र मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. आता याच सीनबद्दल सिद्धांत चतुर्वेदीने मोठा खुलासा केला आहे.

दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘गहराइयां’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील सिद्धांत आणि दीपिका च्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. चित्रपटातील दोघांच्या बोल्ड आणि हॉट सीनमुळे सगळीकडे चर्चा रंगली होती. मात्र सिद्धांत चतुर्वेदीने त्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली, जे म्हणत होते की बोल्ड सीन घेण्यापूर्वी रणवीर सिंगची (Ranveer Singh) परवानगी घेतली गेली होती.

View this post on Instagram

A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

एका मुलाखतीत बोलताना सिद्धांत म्हणाला की, “जशी चर्चा चालू आहे तसे काहीही नाही, आम्ही आमचे काम करत होतो. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. हा सीन करताना मला चित्रपटातील सह कलाकारांनी सुद्धा पाठींबा दिला.” याबद्दल पुढे बोलताना सिद्धांत म्हणाला की, “या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणवीर सिंगसुद्धा गोव्याला आला होता. आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. इतकेच नव्हे, तर या चित्रपटासाठी माझी निवड झाल्यानंतर त्यानेच पहिल्यांदा कॉल करुन माझे कौतुक केले होते. ‘गली बॉय’ चित्रपटापासून तो माझ्या सोबत आहे. माझा मार्गदर्शक म्हणून तो नेहमीच सोबत असतो. त्यामुळे या सीनबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्यात काहीही अर्थ नाही.”

‘गहराइयां’ चित्रपटात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील अनन्या पांडेच्या भूमिकेने सुद्धा सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.

हेही वाचा – 

हेही पाहा-

Latest Post