यश चोप्रा यांच्या “मोहब्बतें” या चित्रपटातून प्रीती झांगियानी या अभिनेत्रीने सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले. हा सिनेमा तुफान गाजला आणि प्रीतीलाही मोठी ओळख मिळाली. “मोहब्बतें” चित्रपटात तिने आपली भूमिका पुरेपूर न्याय देत साकारली. या चित्रपटानंतर तिने अभिनयात चांगलीच झेप घेतली. प्रीतीला या चित्रपटानंतर बॉलिवूड मधूनच नाही तर, मल्याळम, तेलगू, तामिळ, कन्नड़, पंजाबी, बंगाली आणि राजस्थानी चित्रपटांत अभिनय करण्याची संधी मिळाली. तिने “मोहब्बतें”नंतर अनेक चित्रपटांत काम केले परंतु, तिचे इतर सिनेमे यशाला गवसणी घालू शकले नाही. हळूहळू चित्रपटसृष्टी पासून ती दूर झाली. लांबी रेस घोडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रीतीचे करियर अगदी कमी काळातच संपुष्टात आले. नुकताच प्रितीने तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे.
प्रीतीचा जन्म 18 ऑगस्ट 1980मध्ये झाला. प्रीतीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. त्यानंतर राजश्री प्रकाशन निर्मित एका म्युझिक व्हिडिओ मध्ये तिला अभिनयाची संधी मिळाली. तिचा म्युझिक व्हिडिओ “छुई मुई सी तुम” हा त्या काळी चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर “निमा सॅंडल” या साबणाची जाहिरात तिला मिळाली. या जाहिरातीमुळे प्रीती घराघरात पोहचली. “मजहविल्ला” या मल्याळम चित्रपटातून प्रीतीने 1999 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिला “थम्मूदू” हा तेलगू भाषिक चित्रपट देखील मिळाला. अशा दोन वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट केल्यानंतर प्रीतीला पहिला बॉलिवूड चित्रपट मिळाला “मोहब्बते”.
“मोहब्बतें” चित्रपटानंतर प्रीतीचा बॉलीवूडमधील प्रवास सुरु झाला. 90च्या दशकातील या सुंदर अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट मिळाले. मात्र तिला अपेक्षित यश माळले नाही. तिचे सर्व चित्रपट एकामागोमाग एक फ्लॉप झाले.
प्रीतीने ‘ना तुम जानो ना हम’ मध्ये तिने एक छोटा रोल साकारला होता. त्यानंतर ‘आवारा पागल दीवाना’ , ‘चांद के पार चलो’, ‘वाह! तेरा क्या कहना’, ‘बाज: ए बर्ड इन डेंजर’, ‘एलओसी कारगिल’, ‘विक्टोरिया नंबर 203’, ‘देखो ये है मुंबई रियल लाइफ’ अशा अनेक चित्रपटात प्रीती झळकली होती. परंतु या चित्रपटातून ती तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर दाखवु शकली नाही. आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत अनेक भाषांमध्ये काम करूनही प्रीतीला यशाचं शिखर गाठता आले नाही. अनेकवेळा ती सहाय्कक किंवा मल्टीस्टारर भूमिकेतच दिसली. तरीही यश न मिळाल्याने तिने अभिनयाला राम राम ठोकला.
साल 2007 मध्ये प्रीतीने अभिनेता परवीन डबास बरोबर विवाह केला. ते दोघे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं आहेत. प्रीतीच्या मोठ्या मुलाचे नाव जयवीर तर छोट्या मुलाचे नाव देव आहे. सध्या प्रीती आपल्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देत आहे. प्रितीने एकेचाळिसाव्या वर्षात पदार्पण केले असले तरी तिने तिचा फिटनेस टिकवला आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
हेही नक्की वाचा-
–प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी
–आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘ही’ मालिका सज्ज; लवकरच सोनी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री