रविवारी (१५ ऑगस्ट) संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिक आपल्या पद्धतीने देशभक्तीची भावना व्यक्त करत असतो. शहरांमध्ये बॅज किंवा झेंडे लावून देशभक्ती दाखवण्याची फॅशन झाली आहे, पण खेड्यापाड्यात आजही हा दिवस वेगळ्या अंदाजात साजरा केला जातो. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनीही इंस्टाग्रामवर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आणि या पोस्टचे प्रचंड कौतुक देखील केले जात आहेत.
पोस्टमध्ये काय विशेष आहे?
अनुपम खेर यांच्या या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काही गावातील मुले दिसत आहेत. जे जुगाडच्या बनलेल्या वाद्यांवर संगीत वाजवत आहेत. काहींच्या हातात टिनचा ड्रम, तर काहींच्या हातात बासरीसारखा बांबू आहे. ही मुले ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की’ हे गाणं वाजवत आहेत. मध्ये एक लहान मुलगा उभा आहे. त्याचे हावभाव पाहून तुम्ही देखील त्याचे चाहते व्हाल. त्याच्या उंची एवढा उंच बांबू उभा धरून, हा मुलगा एटिट्यूडने कदमताल करत आहे. त्याची ही शैली पाहून खुद्द अनुपम खेर देखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.
त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिले की, “भारतातील एका गावात मुले टिन ड्रमसह लष्करी सूर वाजवत आहेत. त्याचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. खासकरून सर्वात लहान मुलाचे. शेवटी अनुपम यांनी लिहिले की, खरी शक्ती अंतःकरणात असते. या मुलांच्या आत्म्याला सलाम.
मुलांच केले कौतुक
अनुपम खेर यांचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि मनापासून त्याची स्तुतीही करत आहेत. काही इंस्टाग्राम युजर्सनी तर हा व्हिडिओ त्यांच्या गावातील असल्याचा दावा देखील केला आहे. अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचे तब्बल ४.५ मिलियन फोलोवर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा…कडकच ना! ऐश्वर्याने चुलत बहिणीच्या लग्नात लावले जोरदार ठुमके; अभिषेक अन् आराध्यानेही दिली साथ
-खेसारी लाल यादवचे ‘बिहार की तरह डूब जाएंगे’ गाणे रिलीझ; पाहा डान्स अन् मस्तीचा तडका
-भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’