Wednesday, November 13, 2024
Home भोजपूरी खेसारी लाल यादवचे ‘बिहार की तरह डूब जाएंगे’ गाणे रिलीझ; पाहा डान्स अन् मस्तीचा तडका

खेसारी लाल यादवचे ‘बिहार की तरह डूब जाएंगे’ गाणे रिलीझ; पाहा डान्स अन् मस्तीचा तडका

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवची गाणी यूट्यूबवर नेहमीच धुमाकूळ घालत असतात. त्याचबरोबर त्याची गाणी सुपरहिट ठरतात. याच कारणामुळे त्याला मोस्ट ट्रेंडिंग स्टारचा टॅगही मिळाला आहे. मग ते गाणे रोमँटिक गाणे असो किंवा इतर कोणतं. चाहते त्याच्या सर्वच गाण्याला भरभरून प्रेम देत असतात. याच दरम्यान खेसारीचे ‘बिहार की तरह दूब जाएंगे’ हे एक मजेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. जे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या प्रत्येक गाण्याला ज्याप्रकारे प्रतिसाद देतात, अगदी त्याचप्रकारे या गाण्यालाही पसंती दर्शवत आहेत. खेसारीचे गाणे देखील खूपच धमाकेदार आहेत.

खेसारी लाल यादवने आपल्या ‘बिहार की तरह दूब जाएंगे’ या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये डान्स आणि मस्तीचा जबरदस्त तडका दिला आहे. त्याचे हे गाणे सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. त्याचा व्हिडिओ खेसारी म्युझिक वर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच अजित हसलने हे गाणं लिहिले आहे. त्याचबरोबर या गाण्याला संगीत आर्य शर्मा यांनी दिले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत २४ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेत्री डिंपल सिंग देखील त्याच्यासोबत आहे. दोन्ही कलाकारांमधील उत्तम केमिस्ट्री आणि डान्स पाहायला मिळाला आहे.

यावेळी भोजपुरी अभिनेते खेसारी लाल यादवची श्रावणातील सर्वच गाणी जबरदस्त असतात. त्यापैकी ‘महाकाल की दिवाणी’ या गाण्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यात अभिनेता त्याची पत्नी आणि मैत्रिणीबद्दल बोलत होता. दोघे मिळून भक्तीत तल्लीन होऊन डान्स करत आहेत. भोजपुरी बोलबाम गीत ‘महाकाल की दिवाणी’ चा व्हिडिओ खेसारी म्युझिक वर्ल्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. हा व्हिडिओ त्याचे चाहते सतत व्हायरल करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा