बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार येऊन गेले आहेत, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेत. त्याचबरोबर ते चित्रपट सुपरहिट देखील ठरले आहेत. परंतु या कलाकारांनी बॉलिवूडमधून लवकरच निरोप घेतला होता. यामध्ये अभिनेत्री शीबा आकाशदीप साबीर यांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. शीबा यांनी अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात काम केले होते. मात्र, आता ही अभिनेत्री चित्रपटविश्वाला रामराम ठोकून आपल्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे.
अभिनेत्री शीबा यांना दोन मुलं आहेत. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमिळ चित्रपटांपासून केली होती. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. शीबा यांनी १९९१ मध्ये आलेल्या ‘ये आग कब बुझेगी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले होते, पण अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केल्यानंतर शीबांना बॉलिवूडमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. (Actress Sheeba Akashdeep Sabir has bid farewell to Bollywood despite giving a superhit film)
परंतु सलमान खानसोबत चित्रपट केल्यानंतर शीबा यांचे नाव प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. मात्र, ही प्रसिद्धी जास्त काळ टिकून राहिली नाही. या चित्रपटात शीबा यांनी सलमान खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती होती, पण काही चित्रपटांनंतर शीबा चित्रपटांमधून पूर्णपणे गायब झाल्या होत्या. शीबा यांनी ‘प्यार का साया’, ‘मिस्टर बाँड’, ‘हम है कमाल के’, ’तिसरा कौन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तरीही शीबा यांना कोणतेही यश मिळाले नाही. शीबा यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ‘हम बाजा बजा देंगे’ हा होता. हा चित्रपट साल २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता.
शीबा यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा म्हटल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडे वळल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये सातत्याने काम केले, पण छोट्या पडद्यावरही त्यांना आपली फारशी छाप सोडता आली नाही. शीबा सुरुवातीपासूनच मुंबईत राहत आहेत. त्याचबरोबर शीबा यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. शीबा यांनी १९९६ मध्ये चित्रपट निर्माते आकाशदीपसोबत लग्न केले होते. चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी काही महिने एकमेकांना डेट देखील केले होते. त्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले. आकाशदीपने शीबा यांच्या काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स येऊन गेले होते, ज्यांना आपल्या अभिनयाची छाप सोडता आली नाही. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडशी असलेले नाते ही तोडले. शीबा व्यतिरिक्त इतर बरेच कलाकार होते. जे आता इंडस्ट्रीचा भाग नाहीत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आयपीएल आधी ‘कॅप्टन कूल’ने केला रॉकस्टार लूक चाहते; म्हणाले, नको रे राहू ‘या’ अभिनेत्यासोबत
-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक










