Sunday, March 23, 2025
Home बॉलीवूड दीपिका कक्करला शोएबच्या घरातील ‘नोकरानी’ म्हणल्याने भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘तुमच्या आईलाही असंच बोलता का?’

दीपिका कक्करला शोएबच्या घरातील ‘नोकरानी’ म्हणल्याने भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘तुमच्या आईलाही असंच बोलता का?’

अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम ही छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. त्याचबरोबर दीपिका कक्कर बिग बॉसमुळे अनेक वेळा चर्चेत आली होती. टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक दीपिका आणि शोएब अनेकदा त्यांच्या ब्लॉगबद्दल चर्चेत असतात. अलीकडेच शोएबने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यात तो आणि त्याची पत्नी दीपिका दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. एका टीकाकाराने दीपिकाला शोएबच्या घरची मोलकरीण म्हटले होते. त्याचवेळी, दीपिका आणि शोएब हे त्यांच्या कुटुंबावर भाष्य करणाऱ्यांवर प्रचंड संतापले आहेत.

शोएबने या व्हिडिओची सुरुवात खूप प्रेमाने केली होती. पण त्यानंतर दीपिका म्हणते की, आज मला खूप राग आला आहे. (Is that how you feel about your mother? Deepika Padukone responds to critics)

दीपिका पुढे म्हणाली की, “तुम्हाला जरा तरी लाज वाटते का. मी हे सर्वांसाठी म्हणत नाही. पण जे २०% लोक आहेत, ज्यांची विचार करायची पद्धत वाईट आहे. मी त्या लोकांची आभारी आहे, जे आमच्यावर प्रेम करतात. मात्र, बाकीच्या लोकांबद्दल लाज वाटली पाहिजे, जे पप्पांबद्दल अशी कमेंट करत आहेत. पप्पा हॉस्पिटलमधून आले आहेत आणि आम्ही त्यांना आमच्या बेडरुममध्ये हलवले, त्यामुळे तुम्ही लोक कमेंट करत आहात की, मुलीला तिच्या खोलीतून बाहेर काढले वगैरे. आपण कशासाठी बोलत आहात हे आपल्याला समजले आहे का? ते आमचे वडील आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, मला तुमची दया येतेय.”

त्याचबरोबर दीपिका पुढे म्हणाली की, “मला अशा मुली आणि त्यांच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांची काळजी वाटते ज्यांचे इतके वाईट विचार आहेत. लोक म्हणतात की, शोएबचे कुटुंब मला खूप काम करायला लावते आणि मला मोलकरीण म्हणून त्यांनी घरात ठेवले आहे. मला तुम्हाला हे विचारायचे आहे की, तुमची आई सुद्धा एक गृहिणी आहे, तर तुम्हाला तिच्याबद्दल पण असेच वाटते का? तुम्ही तिलाही असेच बोलता का?”

त्याचबरोबर दीपिका पुढे म्हणाली की, “मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की, माझी सासू, माझे सासरे, माझी नणंद, आणि माझी सर्वच सासरची माणसं माझ्यावर खूप प्रेम करतात. मला जे करायचे आहे, ते करण्याचे स्वातंत्र्य आहे. जर तुम्ही अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन माझ्याबद्दल आपली चिंता दाखवत असाल, तर माझ्यावर दया दाखवायची काही गरज नाही आणि आम्हाला फॉलो देखील करू नका.”

अशाप्रकारे अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र ….

-देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल

हे देखील वाचा