Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुपरहिट चित्रपट देऊन नागार्जुनने जिंकली चाहत्यांची मने; लग्न झालेले असतानाही होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात

चित्रपटसृष्टीमध्ये ‘मास’ या नावाने लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत ओळखले जाणारे सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी (nagarjun akkinenni) (29 ऑगस्ट) आपला 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नागार्जुन यांनी दाक्षिणात्य चित्रपटांपासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत चांगलीच कामगिरी केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या लेखातून आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

नागार्जुन यांचा जन्म तामिळनाडूमधील चेन्नई येथे 29 ऑगस्ट, 1959रोजी झाला. सुप्रसिद्ध कलाकार अक्किनेनी नागेश्वर राव यांचे ते सुपूत्र आहेत. अभिनय आणि कलेचे ज्ञान लहानपणापासून घरातच मिळाले. त्यामुळे त्यांनीही अभिनय क्षेत्रात नाव कमवायचे ठरवले. त्यांनी हैदराबादमधील पब्लिक स्कूल येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी अभियांत्रिकीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. (Birthday special nagarjun after marriage actor was in relationship with Tabu know interesting information about this actor)

बालपणापासून अभिनयाची आवड असल्याने त्यांना पहिल्यांदा साल १९६७मध्ये ‘सुदिगुंडलु’ या चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यांनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे बालपणापासूनच त्यांना मोठा चाहतावर्ग मिळाला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकारांची भूमिका साकारली. नागार्जुन यांनी साल 1986 मध्ये ‘विक्रम’ या तमिळ चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. त्याच वर्षी त्यांनी ‘कॅप्टन नागार्जुन’ आणि ‘अरन्याकंडा’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यानंतर त्यांचा चित्रपटातील आलेख उंचीचे शिखर गाठातच राहिला.

नागार्जुनने केला दुसरा विवाह
त्यांनी रामानायडू यांची मुलगी लक्ष्मी डग्गुबतीबरोबर प्रथम विवाह केला. काही वर्षे लोटल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 6 वर्षांनंतर साल 1990मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी साल 1992 मध्ये अमला अक्किनेनींबरोबर लग्नगाठ बांधली. अभिनयामुळे चर्चेत असलेले नागार्जुन त्याकाळी त्याच्या विवाहांमुळे देखील चांगलेच चर्चेत होते.

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींबरोबर सुरू होते अफेअर
बॉलिवूडमधील अभिनेत्री तब्बूबरोबर नागार्जुन यांचे अफेअर सुरू होते. ते दोघे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना भेटले. नागार्जुन विवाहित होते, तरी देखील तब्बूवर प्रेम करत होते. तब्बू देखील त्यांच्यावर प्रेम करत होती. त्या दोघांना संपूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर राहायचे होते. परंतु नागार्जुन यांना त्यांचे दुसरे लग्न मोडायचे नव्हते. त्यामुळे ते दोघे लग्न करू शकले नाहीत आणि वेगळे झाले. परंतु आपले दुसरे लग्न झालेले असताना देखील नागार्जुन यांचे तब्बूबरोबर तब्बल 10 वर्ष अफेअर होते.

अभिनेते दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कमाल करतच होते, त्याचबरोबर साल 1990 मध्ये त्यांनी ‘शिव’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये उडी घेतली. त्यांनतर त्यांनी ‘खुदा गवाह’, ‘द्रोही’, ‘मिस्टर बेचारा’, ‘अंगारे’, ‘जख्म’, ‘अग्नि वर्षा’ आणि ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बरोबर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.

नागार्जुन हे आपल्या अभिनयाने तर रसिक प्रेक्षकांची मने जिंकतच आहेत, परंतु त्यांचा मुलगाही अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे. नागाचैतन्य आणि अखिल अक्किनेनी हे त्यांची मुलं असून दोघेही वर्षोनुवर्षे सुरू असलेल्या अभिनयाच्या कौंटुंबिक परंपरेला वेगळ्या अंदाजाने पुढे नेत आहेत. विशेष म्हणजे नागाचैतन्यची पत्नी समंथा अक्किनेनी ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

हेही नक्की वाचा-
जयश्री गडकरांनी वयाच्या 13व्या वर्षीच केले अभिनयात पदार्पण; तर सर्वांपासून लपूनछपून नेहमी करायच्या ‘हे’ काम
रक्षाबंधन स्पेशल! ‘हे’ कलाकार आपल्या भावा-बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

हे देखील वाचा