Thursday, June 13, 2024

रक्षाबंधन स्पेशल! ‘हे’ कलाकार आपल्या भावा-बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

रक्षाबंधन आलं की सगळीकडे आपल्या धिंगाणा मस्ती आणि शाॅपिंग करताना अनेक तरून दिसतात. आपल्या भारतीय संस्कृतीत बहिण-भावाचे नातं सर्वांत पवित्र नातं समजले जाते. रक्षाबंंधन हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीसाठी काही ना काही गिफ्ट घेत असतो. तुम्हाला अनेकदा प्रश्न पडत असेल की, जर आपण रक्षाबंधन सण साजरा करतो तर बाॅलिवूड सेलिब्रेटी हा सण साजरा करतात का ? तर याच उत्तर आहे. हो, सर्व कलाकार हा सण साजरा करतात. चला तर मग जाणून घेऊया कलाकारंच्या बहिण- भावाच्या जोड्या.

प्रियांका चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्र
प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. प्रियांकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा कुलिनरी आर्ट्सचा कोर्स केला आहे. ते दोघे अगदी मजेत रक्षाबंधन (Rakshabandhan) सण साजरा करतात.  यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये शेफचे प्रशिक्षणही घेतले आहे. सिद्धार्थने पुण्यात The Mugshot Lounge नावाचे रेस्टॉरंटही उघडले आहे. तो प्रियांका चोप्राचे प्रोडक्शन हाऊस पर्पल पेबल पिक्चर्स देखील हाताळतो. ही भाऊ-बहीण जोडी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असते.

प्रियांका चोप्रा आणि सिद्धार्थ चोप्रा

 

 

 

सैफ अली खान,सोहा अली खान आणि सबा अली खान
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि सोहा अली खान यांना प्रत्येकजण ओळखतो, कारण दोन्ही भावंडे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. परंतु सैफची धाकटी बहीण सबा अली खानला प्रसिद्धीझोतात येणे आवडत नाही. सबा व्यवसायाने फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर आहे. ती भोपाळच्या रॉयल ट्रस्टच्या बोर्ड सदस्याही आहेत. सैफ आणि सोहाने बाॅलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे.

रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर
रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर हे दोघे भावंड आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. रणबीरच्या बहिणीला इंडस्ट्रीत येणे आवडत नाही. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तर रिद्धिमा कपूर व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे. रिद्धिमा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. या दोन भावंडांचे नाते खूप घट्ट आहे. रिद्धिमा बर्‍याचदा पार्टी आणि सेलिब्रेशनमध्ये कुटुंबासोबत दिसते.

दिशा पटनी आणि खुशबू पटनी
खुशबू पटनी ही तिची बहीण दिशा पटनीसारखीच फिटनेस क्विन आहे. खुशबू सैन्यात भरती होऊन देशसेवा करत आहे. खुशबू इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. तिथे ती जिममध्ये वर्कआउट करतानाचे तिचे व्हिडिओ अपलोड करत असते. दोन्ही बहिणींचे एकमेकांशी प्रेमसंबंध आहेत. त्या दोघी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात.

दीपिका पदुकोण आणि अनिशा पदुकोण
दीपिका पदुकोण गेली अनेक वर्षे बॉलिवूडवर राज्य करत आहे. दुसरीकडे, तिची बहीण अनिशा हिने अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्रातून पदवी प्राप्त केली आहे. तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्या पावलावर पाऊल टाकून ती चालत आहे. अनिशा गोल्फ खेळते आणि तिने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अनिशाला गोल्फ व्यतिरिक्त क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि हॉकी या खेळांमध्येही रस आहे. अनिशा दीपिका पदुकोणच्या मानसिक आरोग्य फाउंडेशन – लिव्ह लव्ह लाफची सीईओ देखील आहे. (Rakshabandhan Special ‘This’ actor celebrates Rakshabandhan with his brothers and sisters)

अधिक वाचा-
जयश्री गडकरांनी वयाच्या 13व्या वर्षीच केले अभिनयात पदार्पण; तर सर्वांपासून लपूनछपून नेहमी करायच्या ‘हे’ काम
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत

हे देखील वाचा