Wednesday, February 5, 2025
Home मराठी ‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत आहे. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट, ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’ होय. या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली, ती म्हणजे ‘आर्ची; आणि ‘परश्या’. ही पात्रं अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी साकारली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. दोन्हीही कलाकार आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.

रिंकूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिंकूने पांढऱ्या रंगाचा क्रॉपटॉप आणि रिप्ड जीन्स घातलेली आहे. तसेच पायात साधी चप्पल घातलेली आहे. तर तिने सोनेरी रंगाचे‌ इअरिंग घातले आहेत. तसेच तिने मिडल पार्टेशन करून सगळे केस मागे बांधले आहेत. या फोटोमध्ये तिची स्मा‌ईल नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. (Rinku rajguru’s stunning photo viral on social media)

हा फोटो शेअर करून तिने सांगितले आहे की, तिचा हा फोटो तिच्या वडिलांनी काढलेला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. तसेच काही चाहते तिची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत करत आहेत. शिवाय या फोटोमध्ये रिंकूच्या लूकमध्ये कमालीचा बदल झालेला तुम्ही सहज पाहू शकता.

रिंकू राजगुरूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘सैराट’ चित्रपटानंतर तिला खूप यश मिळाले. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा