Thursday, April 18, 2024

‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे पोलीस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे अलीकडेच त्यांच्या पगाराबाबत चर्चेत आले आहेत. त्यांची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बदली केली आहे. आरोप असा आहे की, अमिताभ बच्चन जितेंद्र यांना वर्षाला १.५ कोटी रुपये इतका देतात. ही माहिती मिळाल्यानंतर जितेंद्र यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जितेंद्र शिंदे २०१५ पासून अमिताभ यांच्यासाठी काम करत होते. ते स्वतःची प्रायव्हेट सुरक्षा एजन्सी देखील चालवत होते. याबद्दल बातम्या आल्या आणि याची भनक विभागाच्या काही लोकांना लागली. लगेचच हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचले.

४ वर्षांपेक्षा जास्त नाही काळ राहू शकत एकाच पोलीस ठाण्यात
मुंबई पोलीस आयुक्तपद स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक नियम जारी केला होता की, कोणत्याही व्यक्तीला पोलीस ठाण्यात चार वर्षांपेक्षा जास्त काळ पद धारण करता येणार नाही. विभागाचे म्हणणे आहे की, या नियमांतर्गत शिंदे यांची डीबी मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. तर पगारासंदर्भात अमिताभ बच्चन यांच्या अकाऊंट्स विभागाकडून देखील माहिती मागितली जाऊ शकते.

बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे दर महिन्याला घ्यायचे १२ लाख रुपये
शिंदे नेहमी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीसारखे दिसत होते. काही काळापूर्वी अचानक त्यांच्या पगाराबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. असे म्हटले जात होते की, शिंदेंचा पगार एखाद्या मोठ्या एमएनसी (MNC) च्या सीईओ (CEO) पेक्षा जास्त आहे. अशी चर्चा सुरु झाली की, शिंदे अमिताभ यांच्याकडून दर महिन्याला सुमारे १२ लाख रुपये घेत होते. याशिवाय त्यांना सरकारी पगार देखील मिळत होता.

मात्र, एवढे पैसे घेण्यामागचे कारण असे होते की, ते बच्चन कुटुंबाला आपली वैयक्तिक सुरक्षा देखील देत होते. शिंदे यांनी सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड यांची देखील भारतात आल्यानंतर सुरक्षा केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पप्पी दे पप्पी दे पारुला’, म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या स्मिताचा ग्लॅमरस लूक आला समोर

-शिवानी बावकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; एकता कपूर करणार निर्मिती

-‘…खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ’, प्राजक्ता माळीच्या सुंदर फोटोवरील चाहत्याची कमेंट चर्चेत

हे देखील वाचा