कलाकारांमधील सध्या तरुणाईची आवडती जोडी ही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची आहे. या दोघांच्या जोडीने तरुणाईला पुरते वेड लावले आहे. त्यांच्या लग्नावेळी सोशल मीडियावर फक्त त्या दोघांचीच चर्चा सुरु होती. अनेक क्रिकेटप्रेमी आणि चित्रपटप्रेमींच्या ओठांवर या दोघांचेच कौतुक सुरु असायचे. हे दोघेही एकमेकांबरोबर खूप शोभून दिसतात. विराट आणि अनुष्काने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आपले करिअर आणि खासगी आयुष्य सांभाळत यशाचे शिखर गाठले, त्यामुळे त्या दोघांना एक आदर्श जोडपे म्हणून देखील ओळखले जाते. अनेक तरुण त्यांच्याप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतात.
या दोघांच्या लग्नावेळी हळदीचे, मेहंदीचे आणि अशा अनेक कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते आणि चाहत्यांची त्याला खूप पसंती देखील मिळाली होती. परंतु अलीकडेच अनुष्काचा लग्नामधील आणखी एक फोटो आता व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत क्वचितच लोकांनी पाहिला असेल. या फोटोमध्ये ती तिचा भाऊ कर्णेश शर्मा याच्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये लग्नाआधी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरु आहे. यामध्ये अभिनेत्री पुरती भावुक झाली आहे. तिच्या भावाचा चेहरा देखील गंभीर झाल्याचे दिसत आहे. लग्नावेळी आपल्या आई वडिलांना सोडून दुसऱ्याच्या घरी जाताना सर्वच मुली भावुक होतात. तशाच भावना अनुष्काच्या मनात त्यावेळी आल्या असतील. (anushka sharma chooda ceremony unseen photo from her wedding goes viral on social media)
अनुष्काच्या लग्नावेळी वेगवेगळ्या विधींचे फोटो खूप व्हायरल झाले होते. तिने लग्नामध्ये घातलेल्या घागऱ्यावरील नक्षी फार छान होती. तिच्या लग्नानंतर अनेक मुलींनी आपल्या लग्नात अनुष्का सारखा घागरा घेणे पसंत केले. लग्नातील घागरा आणि तिने केसांचा केलेला फ्लॅट लूक यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते.
विराट आणि अनुष्का आता सुखाने आपले आयुष्य जगात आहेत. तसेच आता त्यांना एक मुलगी देखील आहे. या दोघांनी मिळून तिचे नाव वामिका असे ठेवले आहे. वामिकाचे फोटो अजून सोशल मिडीयावर पाहायला मिळाले नाहीत. विराट आणि अनुष्काचं असं म्हणणं आहे की, “आम्हाला आमचे खाजगी आयुष्य जास्त शेअर करायला आवडत नाही. आमची मुलगी जेव्हा मोठी होईल आणि तिला समजेल सोशल मीडिया काय असतं, तेव्हा आम्ही तिला तिच्या मनासारखं करू देऊ.”
अनुष्काच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले, तर ती ‘झीरो’ या चित्रपटात शेवटची झळकली होती. लग्नांनंतर अभिनेत्री सध्या आपल्या कुटुंबावर लक्ष देत आहे. लवकरच ती चित्रपटांमध्ये आपलं काम एका वेगळ्या आणि नवीन अंदाजात सुरु करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य