Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा ‘मला पडद्यावर गुंडगिरी करायची नाही म्हणत’, राजपाल यादव यांनी ओटीटीवर येणास दिला नकार

‘मला पडद्यावर गुंडगिरी करायची नाही म्हणत’, राजपाल यादव यांनी ओटीटीवर येणास दिला नकार

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे राजपाल यादव‌. गेल्या कित्येक वर्षांपासून राजपाल हे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक चाहत्यांची मने जिंकली. राजपाल यांनी त्यांच्या विनोदी भूमिकेंच्या जोरावर अनेक भूमिका अजरामर केल्या. राजपाल हे नाव उच्चारले तरी लगेच त्यांच्या अनेक विनोदी भूमिका डोळ्यासमोर येतात. आज ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले आहे. बॉलिवूडमधील सर्वच कलाकार आता ओटीटीवर काम करताना दिसत आहे. याच संदर्भात राजपाल यादव यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता.

राजपाल यादव यांना देखील ओटीटीवर बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहे. याबद्दल त्यांना अनेकदा प्रश्न देखील विचारले जातात. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान त्यांना त्यांच्या ओटीटी पदार्पणाबद्दल विचारण्यात आले होते. यावर त्यांनी सांगितले की, ते स्वतःला या प्लॅटफॉर्मसाठी योग्य समजत नाही. त्यामुळेच कदाचित ते अजून ओटीटीवर आलेली नाही. तसे पाहिले तर राजपाल यांचे ओटीटीवर दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्यात एक शिल्पा शेट्टी, परेश रावल, मीझान जाफरी यांचा ‘हंगामा २’ आणि तर वरुण धवन, सारा अली खान यांचा ‘कुली नंबर १’ या दोन चित्रपटांचा समावेश आहे.

पुढे राजपाल यांनी सांगितले की, “ओटीटी प्लॅटफॉर्म खरोखरच खूप प्रसिद्ध होत आहे. परंतु मला नाही वाटत की मी या प्लॅटफॉर्मसाठी योग्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या वेब सीरिज येत आहेत. त्यांच्याशी मी स्वतःला जोडू शकत नाही. मला पडद्यावर गैरवर्तन करायला अजिबात आवडत नाही, जे आजकालच्या वेब सीरिजमध्ये अगदी सामान्य झाले आहे. मी कामाचा कधीच गैरवापर केला नाही, त्यामुळे माझे खूप कौतुक केले जाते.”

पुढे ते म्हणाले, “मला असे काही करायचे नाही, ज्यामुळे माझे झालेले कौतुक लोकांना चुकीचे वाटेल. मला पडद्यावर गुंडगिरी करून उदरनिर्वाह करायचा नाही. मला ते करण्याची गरजही पडणार नाही, कारण मी खूप भाग्यवान आहे की, गेली दोन दशकांनंतरही लोक मला कंटाळले नाही. माझ्यातील अभिनेत्याला जिवंत ठेवण्याचे श्रेय मी माझ्या चाहत्यांनाच देतो.”

राजपाल यादव यांनी बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. बॉलिवूडमधील दिग्गज विनोदी अभिनेत्यांची यादीत राजपाल यांचे नाव अगदी प्रकर्षाने घेतले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा