Thursday, January 29, 2026
Home अन्य ‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील चिमुकली आता झालीये बरीच मोठी; फोटो पाहून ओळख पटणंही झालंय कठीण

‘जय श्री कृष्णा’ मालिकेतील चिमुकली आता झालीये बरीच मोठी; फोटो पाहून ओळख पटणंही झालंय कठीण

चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये तुम्ही आजवर अनेक बाल कलाकारांना ‘श्री कृष्णा’ची भूमिका साकारताना पाहिलं असेल. अशात काही व्यक्ती या बाल कलाकारांना खरे देव असल्याचं समजतात, तर काही जण त्यांची पूजा देखील करतात. अनेक गरोदर महिला आपलं बाळ देखील असच असावं म्हणून घरामध्ये बाल ‘श्री कृष्णा’ची भूमिका साकारलेल्या या बाल कलाकारांचे फोटो भिंतीवर लावतात. ‘गणपती’, ‘श्री कृष्ण’ या देवतांच्या बाल वयातील भूमिका पाहायला प्रेक्षकांना फार आवडते. अशात कलर्स टीव्हीवरील मालिका ‘जय श्री कृष्णा’ मधील बाल ‘कृष्णा’ची भूमिका एका मुलीने साकारली होती. ती सध्या कुठे आहे व काय करते हे जाणून घेऊयात.

कलर्स टीव्हीवर २००८ साली ‘जय श्री कृष्णा’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमध्ये बाल ‘कृष्णा’ची भूमिका ध्रिती भाटियाने साकारली होती. त्यावेळी ध्रिती अवघ्या तीन वर्षांची होती. तिचा भोळा चेहरा, डायलॉग बोलण्याची पद्धत, यामध्ये तिचे येत असलेले बोबडे बोल यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. प्रेक्षक रोज या मालिकेमधून तिला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असत. तिच्या प्रेमळ आणि भोळ्या चेहऱ्याने प्रेक्षकांना पुरते वेड लावले होते. (janmashtami 2021 baby krishna aka dhriti bhatia from jai shri krishna here how she looks like now)

अवघ्या तीन वर्षांच्या ध्रितीने बाल ‘श्री कृष्णा’ची भूमिका दमदार अभिनयाने निभावली होती. आता ती मोठी झाली आहे. तिचे वय १५ वर्ष आहे. तिचे लहानपणीचे चेहऱ्यावरली हास्य आजही तितकेच खुललेले आणि आकर्षक आहे. सध्या तिने अभिनयातून थोडी विश्रांती घेतली आहे आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. तिचे एक इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे. त्यावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. या फोटोंमध्ये तिला ओळखणे कठीण आहे. मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तसेच आजही तिचे चाहते तिने पोस्ट केलेले फोटो आणि इंस्टाग्राम व्हिडिओंवर लाईक्सचा वर्षाव करतात.

ध्रितीचे वडील गगन भाटिया हे एक व्यावसायिक आहेत, तर तिची आई पूनम भाटिया पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ध्रितीला देखील नृत्याची खूप आवड आहे.
तिला मोठं होऊन आई प्रमाणेच कोरियोग्राफर बनायचे आहे. त्यासाठी ती शास्त्रीय नृत्य देखील शिकत आहे. आपल्या अभिनयाची आणि नृत्याची कला जोपासत ती इंस्टाग्रामवर तिचे रील्स व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यातील तिचे नृत्य आणि चेहऱ्यावरील हावभावांनी ती चात्यांना घायाळ करत आहे.

ध्रितीने ‘जय श्री कृष्णा’ या मालिकेनंतर आणखी काही मालिकांमध्ये बाल कलाकारांच्या भूमिका साकारल्या. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘माता की चौकी’ या मालिकांमध्ये ती झळकली होती. कोरोना काळात सर्व मालिकांच्या शुटिंगवर बंदी आणली होती. त्यामुळे टीव्हीवर अनेक जुन्या मालिकांचे पुनर्प्रसारण होत होते. त्यामध्ये ‘जय श्री कृष्णा’ ही मालिका देखील पुनर्प्रसारित करण्यात आली. त्यामुळे प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी देखील पुन्हा जाग्या झाल्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा