Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

शिवानी सोनारचे दिलखेचक फोटो आले समोर; लक्षवेधी ठरतेय ‘इंडियन आयडल’मधील ‘या’ स्पर्धकाची कमेंट

मराठी मालिका या प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडतात. कारण त्यातील पात्र सर्वांना आपल्या जवळची आणि हवीहवीशी वाटतात. यातीलच कलर्स मराठीवरील ‘राजा राणी ची गं जोडी’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री शिवानी सोनार ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. अनेक टॉप अभिनेत्रींना मागे सारून शिवानी आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. या मालिकेतील तिचे डायलॉग, हावभाव, इमोशन या सगळ्या गोष्टी ती अगदी परफेक्ट करत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

शिवानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. यावर तिने पांढऱ्या रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले आहे. तिने गळ्यात ठुशी घातलेली आहे. हातात बांगड्या, कानात कुड्या घातलेल्या आहेत. तसेच केसात गजरा माळलेला आहे. या फोटोतील तिची गोड स्माईल तिच्या या लूकमध्ये आणखी भर घालत आहे. (Shivani sonar share her saree photos on social media)

तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. पण यातील एक कमेंट चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. ‘इंडियन आयडल १२’ ची स्पर्धक अंजली गायकवाड हिने शिवानीच्या फोटोवर ‘सो क्यूट’ अशी कमेंट केली आहे. सोबतच तिने हार्ट ईमोजी देखील पोस्ट केली आहे.

शिवानी सध्या घराघरात पोहचली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मालिकेतील तिचे संजीवनी नावाचे पात्र देखील चांगलेच गाजत आहे. याआधी तिने ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात भूमिका निभावली होती तसेच तिने ‘पांडू’ आणि ‘अगली डेस्क’ या चित्रपटात देखील काम केले आहे. पण यातून तिला काही फारसी ओळख मिळाली नव्हती. पण या मालिकेने तिची लोकप्रियता शिखराला पोहचवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा