पडद्यावरील कलाकार आणि वाद यांचे जणू खूप जुनं नातं आहे. ते नेहमीच आपल्या वागण्या- बोलण्यामुळे वादात अडकत असतात. याचे गंभीर परिणामही त्यांना भोगावे लागतात. आता असेच काहीसे घडले आहे. अभिनेत्री पायल रोहतगी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्याविरुद्ध शिवाजीनगर, पुणे येथे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविरुद्ध वादग्रस्त शब्दांचा वापर केल्यामुळे पुणे काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरं तर एका व्हिडिओत पायल रोहतगीने या थोर व्यक्तींबाबत वादग्रस्त शब्दांचा वापर केला होता. त्यामुळे तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, ५००, ५०२ (२) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Registered Against Actress Payal Rohtagi For Using Objectionable Words Against
Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru)
A case has been registered against actress Payal Rohatgi (in file pic) in Pune for allegedly using objectionable words against Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Indira Gandhi & Rajiv Gandhi in a video shared on social media, under sections 153 (a), 500, 505(2) and 34 of IPC pic.twitter.com/6PICoD2sNm
— ANI (@ANI) September 1, 2021
यापूर्वीही तिने स्वांतत्र्यसैनिक मोतीलाल नेहरू यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मोठा वाद झाला होता. पायलने एक व्हिडिओ शेअर करत दावा केला होता की, “मला वाटते, काँग्रेस कुटुंब तिहेरी तलाकाच्या विरोधात यासाठी होता, कारण मोतीलाल नेहरूंच्या पाच पत्नी होत्या. सोबत मोतीलाल हे जवाहरलाल नेहरूंचे सावत्र वडील होते.” तिने आपल्या दाव्यात एलिना रामाकृष्णांच्या बायोग्राफीचा संदर्भ दिला होता. तिच्या या व्हिडिओमुळे चांगलाच वादंग उभा राहिला होता. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम ६६ आणि ६७ अंतरग्त गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरीही आपल्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची ही पायलची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिच्यावर अनेकदा अटकही झाली आहे. पायलवर काही महिन्यांपूर्वीच सोसायटीच्या चेअरमनला शिवी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आले होते.
पायलच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं, तर तिने ‘तौबा तौबा’, ‘ढोल’, ‘मेन नॉट अलाऊड’, ‘पोलिस फोर्स’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट