सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

आपल्या आवडत्या कलाकारांविषयी सर्व माहिती असावी असे प्रत्येक चाहत्याला वाटते. यासाठी चाहते आपल्या कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट्समध्ये काही ना काही प्रश्न विचारतच असतात. आपल्या आवडीचा कलाकार सध्या काय करत आहे? त्याचा आगामी चित्रपट कोणता येणार आहे? यापासून ते त्याच्या खासगी आयुष्यात काय सुरु आहे? इथपर्यंत चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. अशात सध्या सोनम कपूरच्या चाहते आयुष्यातील एक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

प्रेक्षक सोनमला सतत ती प्रेग्नेंट आहे की नाही, या विषयी विचारत आहेत. यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरु आहे. चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना सोनम तिच्या हटके अंदाजामध्ये उत्तर देत असते. चाहत्यांनी तिच्या प्रेग्नेंसीवर निर्माण केलेल्या प्रश्नावर देखील तिने असेच हटके उत्तर दिले आहे. सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत याचे उत्तर दिले आहे. (viral social sonam kapoor herself gave the answer by sharing the photo pregnant or not)

सोनम गरोदर आहे की नाही?
तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी ठेवून ती गरोदर नसल्याचा इशारा तिच्या चाहत्यांना दिला आहे. सोनमने या स्टोरीमध्ये आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. ती या व्हिडिओमध्ये स्वतःच्या पोटाचा फोटो काढताना दिसत आहे. यामध्ये तिने राखाडी रंगाचे टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे. तसेच तिच्या कमरेवर असलेली सोन्याच्या चैनमुळे ती चाहत्यांना आकर्षित करत आहे. हातामध्ये फोन धरून ती आरशासमोर उभी आहे. तसेच आपले पोट ती सर्वांना दाखवत आहे. यामधून तिला ती गरोदर नाही हेच सांगायचे आहे. तिच्या या स्टोरीला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. तिचे हे हटके उत्तर देखील चाहत्यांना खूप आवडले.

सोनमने काही दिवसांपूर्वी अशीच एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने तिच्या मासिक पाळीचा उल्लेख केला होता. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना पुर्णविराम लागला होता. तसेच ती तेव्हा लंडनमध्ये तिचा पती आनंद आहूजासोबत राहत होती. बाहेर कोरोनाची परिस्थिती असल्याने तिला घरातील सर्व कामे करावी लागत होती. तिने तिचा हा अनुभव देखील चाहत्यांना सांगितला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनम म्हणाली होती की, “माझ्या पतीबरोबर या परिस्थितीमध्ये एकत्र राहून मला जीवनाचा एक वेगळा अर्थ समजला.” सध्या सोनम भारतात परतली आहे. खूप दिवसानंतर आपल्या कुटुंबियांना भेटून ती भावुक झाली होती. विमानतळावर तिला घेण्यासाठी तिचे वडील अनिल कपूर स्वतः गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

Latest Post