Saturday, December 28, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘उतरण’ फेम अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, ‘मी बिकिनीतील फोटो पोस्ट केलेला चाहत्यांना आवडत नाही, कारण…’

प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘उतरण’द्वारे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री टीना दत्ताला अनेकदा सोशल मीडियावरील तिच्या पोस्टसाठी ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. मात्र, याचा टीनावर विशेष परिणाम होत नाही. टीनाला तिच्या बोल्ड लूकसाठी कोणी ट्रोल केले तरी देखील ती चोख उत्तर देते आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी अनेक बोल्ड फोटो शेअर करते. आता टीनाने खुलासा केला आहे की, चाहत्यांना तिला बिकिनी किंवा इतर कोणत्याही रिविलिंग ड्रेसमध्ये का पाहायला आवडत नाही.

चाहत्यांना टीनाला बिकिनीमध्ये बघायला का आवडत नाही?
टीना दत्ताने माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे की, लोकांना तिच्या ‘मीठी’ आणि ‘इच्छा’च्या ऑनस्क्रीन भूमिकांसाठी तिला बोल्ड लूकमध्ये पाहणे अजूनही आवडत नाही. ती म्हणाली की, “आजही मी मोनोकनी किंवा बिकिनी परिधान केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, तर चाहते टिप्पणी करत लिहितात की, ‘आजही आम्हाला तुम्हाला ‘उतरण’मधील इच्छा म्हणून पाहायला आवडते. तुम्ही सोशल मीडियावर बिकिनी घातलेले फोटो शेअर करता पण आम्हाला आवडत नाही. इच्छा- मिठी असे कपडे कसे घालू शकतात?’”

‘उतरण’मधील भूमिका प्रेक्षकांच्या मनावर रुजली
टीना पुढे सांगते की, जेव्हा आपण बराच काळ एखादी भूमिका करत असतो, तेव्हा लोकांसाठी ती एक वेगळी ओळख बनते. लोक त्या पात्राशी भावनिकरीत्या जोडले जातात आणि अशा परिस्थितीत त्यांना त्या व्यक्तीला वेगळ्या पात्रात स्वीकारणे खूप कठीण होते. ती पुढे म्हणते की, “मला आनंद आहे की, लोक अजूनही मला ‘उतरण’चे पात्र म्हणून लक्षात ठेवतात, पण माझी इच्छा आहे की, लोक माझी पडद्यावरील ओळखीपेक्षा माझी खरी ओळख जास्त स्वीकारतील.”

‘या’ शोमध्ये टीनाने महत्त्वाची भूमिका साकारली
टीना दत्ताने टीव्ही शो ‘सिस्टर निवेदिता’ पासून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. यानंतर ‘उत्तरन’ या मालिकेतून टीनाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. शोमधील तिची साधी भूमिका सर्वांना चांगलीच आवडली. तिने ‘उतरण’नंतर ’डायन’ आणि ‘कर्मफल दाता शनी’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली.

टीना सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नेहमीच ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी आणि टॉपलेस फोटो शेअर करत सोशल मीडियावर आग लावत असते. टीनाला इंस्टाग्राम अकाऊंटवर २.७ दशलक्ष चाहते फॉलो करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

हे देखील वाचा