सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचा समावेश होतो. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सतत चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्यंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सईने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे समुद्रावरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी उभी राहिलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

सईचे अनेक चाहते तसेच अनेक कलाकार देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोवर प्रार्थना बेहेरे हिने “प्रीटी यू,” अशी कमेंट केली आहे, तर यासोबत गिरीजा ओक, प्रिया बापट आणि ऋतुजा बागवे यांनी देखील तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. तसेच तिचे चाहते देखील फायर आणि हार्ट ईमोजी पोस्ट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (marathi actress sai tamhankar share her photos on social media)

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबतच तिने टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

तसेच तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

Latest Post