बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा अभिनेता पती अंगद बेदी हे दोघे दुसऱ्यांदा आई- बाबा होणार आहेत. लवकरच ते आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. नुकताच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एका सुंदर पोस्टसह हे जाहीर केले. पुन्हा एकदा तिने तिच्या बेबी शॉवरच्या फोटोंनी सर्वांना सरप्राईझ दिले आहे.
यासह तिने एक भावनिक नोटही शेअर केली आहे. त्यामध्ये असे लिहिले की, “मला माहित नव्हते की, आज असे होईल… सर्वात सुंदर ‘सरप्राईझ’ बेबी शॉवर. अशाप्रकारे सर्व मैत्रिणींनी आपल्या खुफिया धूपियाला पकडले.”
मागील काही दिवसांपूर्वी अंगद बेदीने नेहासोबत एक फोटो शेअर केला. ज्यात ती बेबी बंपची झलक दाखवत होती.
अंगदने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले होते की, “माझ्या सामर्थ्याच्या स्तंभाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला फक्त २७ ऑगस्ट साजरा करण्याची गरज नाही. आयुष्यभर दररोज साजरा केला पाहिजे. वाहेगुरू तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि खूप काही. ताठ मानेने आयुष्य जग. तुझ्या या आयुष्यातील अद्भुत प्रवासाचा मी फक्त एक छोटासा भाग आहे… मला आशा आहे की, आम्ही एकत्र येण्याची वर्षे अविस्मरणीय बनवू. मी नेहमी तुझा हात धरेल. तू जशी आहेस तशीच राहा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मेहरची आई.”
काही दिवसांपूर्वी नेहाने सोशल मीडियावर आपली दुसरी गर्भधारणा जाहीर केली होती. नेहाने अभिनेता पती अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबत एक फोटो शेअर केला होता. फोटोत तिने बेबी बंपवर हात ठेवला होता. तसेच नेहाने या फोटोला कॅप्शन लिहिले होते की, “आम्हाला एक कॅप्शन घेऊन येण्यास २ दिवस लागले. आम्ही सर्वोत्तम विचार करू शकलो ते होते, धन्यवाद देवा, वाहेगुरू कृपा ठेवा.”
अंगद आणि नेहा हे दोन वर्षांच्या मेहर धुपिया बेदीचे पालक आहेत. अंगद आणि नेहाने २०१८१ मध्ये दिल्लीत लग्न केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट
-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!