Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

मनोरंजन विश्वातील हँडसम हंक आणि टेलिव्हिजन सुपरस्टार असणाऱ्या ४० वर्षीय सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) अचानक निधन झाले. सर्वांसाठीच ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. सिद्धार्थने त्याच्या या संपूर्ण अभिनयाच्या १२/१३ वर्षांच्या प्रवासात अमाप लोकप्रियता मिळवली. फक्त टीव्ही नाही तर बॉलिवूडमध्ये देखील झळकलेल्या सिद्धार्थने चिकाटी आणि मेहनतीने त्याची कारकीर्द तयार केली होते. या लेखातून आपण त्याच्या कारकिर्दीविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर, १९८० साली मुंबईत झाला होता. शालेय जीवनात त्याला टेनिस आणि फुटबॉल या खेळणाची खूप आवड होती. किंबहुना तो या खेळांमध्ये चॅम्पियन होता. त्याचे वडील अशोक शुक्ला सिव्हिल इंजिनियर होते, तर आई रिटा शुक्ला गृहिणी. खूपच लवकरच त्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. त्याने इंटिरियर डिझाइनमध्ये पदवी संपादन केल्यानंतर काही वर्ष त्याने एका फर्ममध्ये काम देखील केले.

मात्र, पुढे त्याने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये त्याचे नशीब अजमावण्यासाठी २००४ साली त्याने एका स्पर्धेत भाग घेतला आणि तो ‘ग्लॅड्रॅग्स मॅनहंट मेगामोडेल’ स्पर्धेत उपविजेता ठरला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. यानंतर तो प्रसिद्ध गायिका आला अरुण यांच्या ‘रेशीम का रुमाल’ या म्युझिक अल्बममध्ये झळकला. २००५ साली त्याने तुर्कीमध्ये झालेल्या ‘वर्ल्डस बेस्ट मॉडेल’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तो पहिला भारतीय सोबतच पहिला आशियायी स्पर्धक ठरला ज्याने ४० प्रतिस्पर्धकांना मात देत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेक सहभागी झालेले सर्व स्पर्धक हे अमेरिकी, युरोप मधून आले होते. याच कारणामुळे त्याच्यासाठी हे विजेतेपद खूपच खास राहिले. या स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक जाहिरातींसाठी विचारणा झाली. तो बजाज अव्हेंजर, आयसीआयसीआय आदी अनेक जाहिरातींमध्ये दिसला.

‘बाबुल का आंगण छूटे ना’ मालिकेतून २००८ साली त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या मालिकेनंतर तो ‘जाने पेहचानसे…ये अजनबी’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘आहट’, ‘सीआयडी’ या मालिकांमध्ये दिसला. पुढे २०१२ साल उजाडले आणि त्याच्या कारकिर्दीने चांगले मोठे वळण घेतले, ज्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले. याचवर्षी तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा ‘बालिकावधू’ सीरियलमध्ये शिवराज शेखर या मुख्य भूमिकेत झळकला. या मालिकेने त्याला यशाचे आणि लोकप्रियतेचे शिखर गाठून दिले.

त्याने २०१३ साली ‘झलक दिखला जा ६’ या डान्स शोमध्ये सहभाग घेतला. त्याने करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत तीन चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट केले. याच कॉन्ट्रॅक्टनुसार तो २०१४ साली ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ सिनेमात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला. २०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात त्याने ‘सावधान इंडिया’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो होस्ट केले, तर ‘खतरो के खिलाडी ७’ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर तो ‘दिल से दिल तक’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला.

सिद्धार्थच्या आयुष्याला पुन्हा एकदा मोठी कलाटणी देणारे वर्ष ठरले २०१९. या वर्षी त्याने बिग बॉस १३ मध्ये सहभाग घेतला. अतिशय उत्तम पद्धतीने खेळ खेळत सिद्धार्थने हा शो जिंकला आणि त्याची लोकप्रियता गगनाला भिडली. या शोनंतर त्याच्या फॅन्समध्ये लाखोंची भर पडली. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तो अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला. नुकतीच त्याची एकता कपूरचा अल्ट बालाजीची ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजला आणि या सीरिजमधल्या सिद्धार्थच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

सिद्धार्थला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बिग बॉसमध्ये असतांना त्याचे अनेकांशी खूप वाद झाले. खास करून त्याची सहकलाकार राहिलेल्या रश्मी देसाईसोबत. याच घरात त्याला शेहनाज गिल ही चांगली मैत्रीण देखील मिळाली होती. त्याला तुफान फॅन फॉलोविंग होती. ह्याच वर्षी सिद्धार्थ मोस्ट डिझायरेबल मॅन ऑन टीव्ही ठरला होता. टीव्हीवरील अनेक मोठ- मोठ्या कलाकरांना मागे टाकत त्याने हा किताब मिळवला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सई ताम्हणकरचा समुद्रात जलवा; चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

-‘नुसती क्यूट आहेस तू’, म्हणत वीणा जगतापच्या फोटोवर चाहत्याने केली लक्षवेधी कमेंट

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

हे देखील वाचा