Monday, August 4, 2025
Home अन्य ‘बाळाचे वडील कोण?’ नुसरतने ट्रोलर्सना दिले झणझणीत उत्तर; शेअर केली ‘ही’ पोस्ट

‘बाळाचे वडील कोण?’ नुसरतने ट्रोलर्सना दिले झणझणीत उत्तर; शेअर केली ‘ही’ पोस्ट

बहुतेक कलाकार आपल्या आयुष्यामध्ये एका जोडीदारावर कधीच ठाम नसतात. थोडे मतभेद आणि गैरसमज झाले की ते लगेच वेगळे होतात. लग्न झाले असले, तरी ते घटस्फोट घेतात. काहींच्या आयुष्यात अभिनय क्षेत्रात पुढे जाणे एवढे महत्वाचे असते की, ते त्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास तयार होतात. अशात अभिनय करत असताना कलाकार त्यांच्या सहकलाकारांबरोबर जास्त वेळ असतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकमेकांसंबंधी भावना निर्माण होतात. अनेक जण प्रेमात पडून आपल्या आधीच्या जोडीदाराबरोबर घटस्फोट घेतात. अशात भारतीय संस्कृती नुसार असे करणाऱ्या स्त्रीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. समाजाला तिचे हे वागणे कधीच पचत नाही. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री नुसरत जहांसोबत घडत आहे.

 

नुसरत जहां ही एक अभिनेत्री असून ती लोकसभेमध्ये खासदार देखील आहे. नुसरतने १२ मार्च २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अभिनेत्री तिच्या अभिनयाने आणि राजकारणाने कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची ती एकही संधी सोडत नाही. तिने निखिल जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी तिने एक पोस्ट शेअर करत सांगितले की, निखिल आणि मी वेगळे होत आहोत. आमचे लग्न झाले नव्हते. आम्ही फक्त लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. आता आम्ही वेगळे होत आहोत. त्यानंतर नुसरत आणि यश दासगुप्ता या दोघांविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली. यश हा नुसरतचा सहकलाकार आहे. या सर्व प्रकारावरून अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. (Actress and MP Nusrat Jahan trolls for criticising her post delivery)

अभिनेत्रीने २६ ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला आहे. हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत यश देखील होता. त्यावेळी सर्वात प्रथम त्यानेच नुसरत आई झाल्याची बातमी शेअर केली होती. त्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, “जे लोक नुसरतची काळजी करत आहेत त्यांना सांगतो की, आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.” तसेच अभिनेत्रीने देखील सोशल मीडियावर ती आई झाल्याची एक पोस्ट शेअर केली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळ यशच्या हातात होते. यावरून तिच्या चाहत्यांनी तिला खूप ट्रोल केले. अनेकांनी तिला नकारात्मक कमेंट देखील केल्या. तिच्या काही चाहत्यांनी तिला “बाळाचे वडील कोण?” असे देखील विचारले. या सर्वांवर तिने आता तिची जहरी प्रतिक्रिया दिली आहे. नुसरतने एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्या लोकांकडून तुम्ही कोणता सल्ला घेत नाही, त्यांच्याकडून झालेली टीकाही स्वीकारू नका.” अभिनेत्रीने ट्रोलर्सना अशा पद्धतीने झणझणीत उत्तर देत पुढे न्यू रोल, न्यू लूक असे हॅशटॅग वापरले आहेत.

दुसरीकडे निखिलने आलेल्या लहान पाहुण्याचे स्वागत केले आहे. निखिल म्हणाला की,”तिच्या बरोबर असलेले माझे मतभेद मला बाळाला शुभेच्छा देण्यापासून नाही थांबवू शकत. बाळ सुदृढ आणि निरोगी रहावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तसेच त्याचं भविष्य उज्वल होवो अशी सदिच्छा व्यक्त्त करतो.” निखिल हा एक व्यावसायिक आहे. साल २०१८मध्ये एका कामानिमित्त त्याची नुसरत बरोबर ओळख झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

हे देखील वाचा