सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

 

सिद्धार्थ शुक्लाची अंतिम यात्रा सुरु झाली आहे. शव विच्छेदनानंतर सिद्धार्थचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून थेट ओशिवरा स्मशानभूमीत नेण्यात आले आहे. स्मशानभूमीतच त्याचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सिद्धार्थ शुक्लच्या पार्थिवाला पोलिसांनी घरी नेण्यास परवानगी न दिल्यामुळे हॉस्पिटलमधून ते ओशिवरा स्मशानभूमीत नेण्यात आले. पोलिसांनी घरी पार्थिव शरीर नेण्यास का नकार दिला याचे ठोस कारण समोर आले नाहीये.

सिद्धार्थवर थोड्याच वेळात अंतिम संस्कार होणार आहे. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याची आई, बहिणी, त्याची जवळची मैत्रीण असलेली शेहनाज गिल, बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील अनेक कलाकार, त्याचे मित्र, फॅन्स सर्वच उपस्थित आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील हजर आहे. त्याच्यावर ब्रह्मकुमारी प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार होणार असून, सिद्धार्थचे सर्व अंतिम संस्काराचे विधी त्याचे मेहुणे करणार असल्याचे समजत आहे. ब्रह्मकुमारीचे अनेक लोकं देखील यावेळी तेथे उपस्थित आहे. मुख्य बाब म्हणजे १ एप्रिल २०१६ रोजी याच स्मशान भूमीत प्रत्युषा बॅनर्जीवर अंत्यसंस्कार झाले होते. किती तो योगायोग म्हणावा, सिद्धार्थच्या वडिलांचे निधन देखील हृदयविकाराच्या धक्क्याने झाले होते.

तत्पूर्वी २ सप्टेंबर गुरुवारी सिद्धार्थ शुक्लाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या केवळ ४० व्या वर्षी त्याने या जगाचा अचानक निरोप घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचे रिपोर्ट लवकरच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता असलेला सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये देखील हिट ठरला. आकर्षक व्यक्तिमत्व असणारा सिद्धार्थ सर्वच तरुणींचा लाडका अभिनेता होता. बिग बॉस १३ चा किताब जिंकल्यानंतर तर त्याची लोकप्रियता आणि प्रसिद्धी गगनाला भिडत होती. तो त्याच्या करियरच्या अशा काळात होता जिथे तो जे प्रोजेक्ट करायचा ते हिटच होत होते. मोठ्या मेहनतीने, चिकाटीने सिद्धार्थने त्याचे करियर बनवले होते. टीव्ही, चित्रपट, डिजिटल सर्वच माध्यमांमध्ये गाजणाऱ्या सिद्धार्थची अशी एक्सिट सर्वांनाच चटका देऊन जात आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

Latest Post