Sunday, April 20, 2025
Home अन्य कर हर मैदान फतेह! दिव्यांका त्रिपाठीने उचलला तंदुरुस्त राहण्याचा विडा; ‘अशाप्रकारे’ करतेय कसरत

कर हर मैदान फतेह! दिव्यांका त्रिपाठीने उचलला तंदुरुस्त राहण्याचा विडा; ‘अशाप्रकारे’ करतेय कसरत

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर सध्या दिव्यांकाने आपल्या बिनधास्त अंदाजाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती सध्या रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी ११’ या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये दिव्यांका धाडसाने आणि जिद्दीने स्टंट करताना दिसत आहे. दिव्यांका नेहमीच तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरमुळे चर्चेत असते. याव्यितिरिक्त ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. अशातच ती आता तिच्या एका वर्कआऊट व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती प्रचंड घाम गाळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती जमिनीवर कसरत करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि जॅगिंग घातली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अगदी बरोबर नाही, पण इतकेही वाईट नाही. फक्त नवीन गोष्टी शिकणे आणि दररोज सुधारणे.”

चाहत्यांनी दिव्यांकाच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

तिने स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्याचे ध्येय ठेवले आहे. दिव्यांका कधी तरच तिचे जिमचे वेळापत्रक चुकवते. ती तिच्या फिटनेस व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकत राहते. दिव्यांका केवळ एक चांगली अभिनेत्री नसून ती सर्व महिलांसाठी एक फॅशन आयकॉनही आहे. जेव्हा फॅशन स्टेटमेंटचा प्रश्न येतो, तेव्हा दिव्यांका तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही.

दिव्यांकाने टीव्ही सीरियल ‘बनूं मैं तेरी दुल्हन’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियताही मिळाली होती. त्यानंतर दिव्यांका त्रिपाठी करण पटेलसोबत ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत दिसली होती. यात दिव्यांकाने ‘इशिता’ आणि करणने ‘रमण’ची भूमिका साकारली होती. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा