Saturday, April 20, 2024

एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे होय. तिने पुढे तिच्या अभिनयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटाकडे देखील वळवला. तिथे देखील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच नावाजले. अनुजा एक विविध गुणसंपन्न असणारी अभिनेत्री आहे. तिने अगदी साध्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. अनुजा तिच्या आयुष्यात फिटनेसला‌ खूप महत्त्व देते. अनेकवेळा तिचे जिममधील फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे.

अनुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती अत्यंत आकर्षक दिसत आहे. तिने चॉकलेटी रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर तिचे केस आलेले आहे. त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Anuja sathe’s bold photos viral on social media)

तिच्या या फोटोवर अनेक चाहते तसेच कलाकार देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. फोटोवर रेश्मा शिंदे हिने फायर ईमोजी पोस्ट केली आहे, तर श्रेया बुगडे हिने “स्टनिंग,” अशी कमेंट केली आहे. तसेच इशिता गांगुली हिने देखील कमेंट करून अनुजाच्या लूकचे कौतुक केले आहे. तसेच तिचे चाहते देखील वारंवार या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अनुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘एक थी बेगम’, ‘पेशवा बाजीराव’, ‘तमन्ना’, परमाणू’, ‘झाँसी की राणी’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मराठीमध्ये ‘व्हॉट्सऍप लग्न’, ‘राखणदार’, ‘मी पण सचिन’, ‘भो भो’, ‘घंटा’, ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘लगोरी’ या मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनालीच्या साडीमधील स्टायलिश लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, चाहता म्हणाला, ‘तुम्हाला कधीही बघावं, पहिल्यापेक्षा…’

-‘दिवसेंदिवस तू सुंदर दिसत आहेस’, तेजश्री प्रधानच्या सुंदर फोटोवर चाहता घायाळ

-ओहो! ‘पार्टी ऑल नाईट’ गाण्यावर ‘शालू’ने दिले भन्नाट एक्सप्रेशन्स; चाहत्यांकडून मिळतेय कमालीची पसंती

हे देखील वाचा