हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऍंजेलिना जोलीने अलीकडेच दावा केला आहे की, तिला पती ब्रॅड पिटसोबत वैवाहिक नातेसंबंध असताना खूप भीती वाटायची. इतकेच नव्हे, तर तिला तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटत होती. त्याचबरोबर भविष्यात तो ठीक आणि शांत होईल अशी आशा देखील अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, ऍंजेलिना जोलीने पूर्वी दावा केला होता की, तिच्या माजी पतीने तिची मुलं मॅडॉक्स, पॅक्स, झहरा, शिलोह आणि जुळे नॉक्स आणि विवियन यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले होते. यामध्ये तिचा मोठा मुलगा मॅडॉक्ससोबत एका खाजगी विमानात झालेल्या दुर्घटनेचाही समावेशही आहे. त्याचवेळी, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने उघड केले की, पिटसोबतच्या नातेसंबंधादरम्यान ती तिच्या मुलांच्या पालन-पोषणला घेऊन बरीच घाबरली होती. (angelina jolie on brad pitt says she feared for her and her family safety during marriage)
माध्यमांतील वृत्तानुसार, ऍंजेलिना जोलीला विचारण्यात आले की, तिने तिचे आगामी पुस्तक मुलांच्या हक्कांवर लिहिण्याचा निर्णय का घेतला? यावर अभिनेत्री म्हणाली की, तिच्या कायदेशीर स्थितीमुळे ती याबद्दल बोलू शकत नाही. ऍंजेलिनाने याची पुष्टी केली आणि म्हटले की, ती तिच्या घटस्फोटाचे आणि तिने ब्रॅडवर केलेल्या घरगुती अत्याचारांच्या आरोपांचे संकेत देत आहे.
ऍंजेलिना जोलीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने तिच्या कारकिर्दीत गोल्डन ग्लोब पुरस्कार, स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि ऍकॅडमी पुरस्कार जिंकले आहेत. क्वचितच लोकांना माहिती असेल की, ऍंजेलिना डिप्रेशनची शिकार देखील झाली आहे. इतकेच नव्हे, तर यामुळे तिला ड्रग्जचे व्यसनही लागले होते. मात्र, आता ती या सगळ्यातून सावरली आहे आणि तिच्या कारकिर्दीवर फोकस करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…