Wednesday, June 3, 2026
Home मराठी अगदी इंद्रधनुष्य दिसतोय! शिव ठाकरेच्या ‘हटके’ पोझने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष

अगदी इंद्रधनुष्य दिसतोय! शिव ठाकरेच्या ‘हटके’ पोझने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा सर्वांचा लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सीझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. परंतु तो नंतर काही खास निदर्शनास आला नाही. पण सोशल मीडियावर मात्र तो नेहमीच सक्रिय असतो. अशातच त्याचे स्टाईलिश लूकमधील काही फोटो व्हायरल होत आहे.

शिवने अधिकृत अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने अत्यंत स्टायलिश ड्रेस घातला आहे. त्याने रंगीबेरंगी ड्रेस घातला आहे. तसेच ड्रेसला मॅचिंग शूज घातले आहेत. तसेच त्याने अत्यंत मजेशीर पोझ देत हा फोटो काढला आहे. या सप्तरंगी ड्रेसमध्ये तो खूपच आकर्षक दिसत आहे. (bigg boss fame shiv thakare’s stylish look viral on social media)

या फोटो शेअर करून त्याने इंद्रधनुष्याची ईमोजी पोस्ट केली आहे. त्याच्या चाहत्यांना हा स्टायलिश लूक खूप आवडला आहे. काहींना त्याची पोझ आवडली आहे, तर काहींना त्याचे ड्रेस आणि शूज आवडले आहेत. त्याचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत.

शिवने याआधी एमटीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि वीणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांची देखील मने जिंकली होती. त्यामुळेच तो बिग बॉसच्या‌ दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा