भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये तसेच मालिका क्षेत्रामध्ये अनेकदा नव्या कलाकारांना कास्टिंग काऊच, लैंगिक शोषण या सगळ्याचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपण याबाबतच्या बातम्या वाचल्या असतील किंवा ऐकल्याही असतील. विशेषतः स्त्री कलाकार असतात त्या या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात अडकत जातात. फार कमी कलाकार असतात जे निर्भीडपणे सर्वांसमोर येऊन सत्य मांडतात. परंतु बरेच इभ्रतीपोटी या गोष्टी सांगत नाहीत. पोलिसात तक्रारदेखील करत नाहीत. काही दिवसांपूर्वी मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वपूर्ण खुलासे केले. नेमकं काय म्हणाली रश्मी चला पाहुयात….!
भोजपुरी इंडस्ट्रीमधून टेलिव्हिजनमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मी देसाई आज घरोघर तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते. रश्मीने बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनामध्ये एक विशेष छाप पाडली आहे. विशेषतः उतरन या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली. रश्मी स्वत:च्या संघर्षावर बर्याच वेळा बोलली आहे. बर्याचदा तिला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला आणि तिने स्वतःचा मार्ग स्वतःच तयार केला. तिने वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने नुकताच खुलासा केला की तिला घटस्फोट, नैराश्य आणि लैंगिक अत्याचार तसेच कास्टिंग काउचचा त्रास सहन करावा लागला होता.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रश्मी देसाईने तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. तीचं बालपण दारिद्र्यात गेलं. दारिद्र्य इतकं होतं की दोन वेळेचं जेवण सुद्धा कधी उपलब्ध होत नसे. उत्सवाच्या दिवशी तर घरात पैसे देखील नसायचे. तिने पुढे असंही सांगितलं की बालपणी एक बाई तीच्यावर लक्ष ठेवून होती, जर ती त्या बाईच्या हातात सापडली असती तर तिने रश्मीला उचलून नेलं असतं.
रश्मी देसाईने वयाच्या १६ व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली. कॅमेर्यासमोर काम करण्यासाठी सुरुवातीच्या दिवसांत तिला खूप त्रास सहन करावा लागला असल्याचं तिने सांगितलं. रश्मी म्हणाली की एक माणूस तिला असा भेटला होता जो तिला फसवून तिचा गैरफायदा घेऊ पाहत होता.
कास्टिंग काउचबद्दल अभिनेत्री रश्मी देसाई म्हणते की हो तिने लैंगिक शोषणाचा सामना केला आहे. कारण त्यावेळी असं असायचं की जर तुम्ही कास्टिंग काऊचमधून गेला नाहीत तर तुम्हाला काम मिळू शकत नव्हतं. १६ वर्षांची असताना रश्मीचा फायदा घेण्याचे एका सूरज नामक व्यक्तीने प्रत्येक प्रयत्न करून पाहिले पण त्यात त्याला यश आलं नाही. तो रश्मीच्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देखील मिसळायचा. तिचं दैव बलवत्तर म्हणून ती या सगळ्यातून कशी बशी सुटली.
याशिवाय ट्रोलर्सना देखील रश्मीने एक चपराक लगावली आहे. तिने सांगितलं की अनेकदा तिला तिचं शरीर, कपडे, मेकअप, केस यावरून ट्रोल केलं जातं. परंतु यावर तिने स्पष्ट शब्दात ट्रोलर्सना सांगितलं आहे की ते तिचं शरीर आहे आणि त्याच्यासोबत जे काही करायचं असले ते ती करेल. ती कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही.










